शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मेट्रो स्थानकाजवळच्या खांबांवर 'व्हर्टिकल गार्डन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:11 IST

मेट्रोच्या प्रत्येक स्थानकामध्ये पुणे शहराची वैशिष्ट्ये दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुभाजकांमध्ये फ्लॉवर बेड : निगराणी असणार पालिकेकडेवाहनांची ये-जा होऊ नये यासाठी ही जागा दुभाजकाने बंद करण्यात येणार संपुर्ण मेट्रो मार्गावरच असे शोभीवंत दुभाजक तयार करण्यात येणार

पुणे: जमिनीपासून १८ ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या स्थानकानजिकच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे. दोन खांबांच्या मधील रस्त्यावरच्या जागेतही दुभाजक टाकण्यात येणार असून त्यात फ्लॉवर बेड तयार करण्यात येणार आहे.मेट्रो प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली. मेट्रो चे सगळेच काम शोभीवंत दिसावे यासाठी महामेट्रोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातूनच स्थानकांजवळच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन (खांबांचा आधार घेत त्यावर प्लॅस्टिकच्या कुंड्यांमध्ये लावलेली फुलझाडे) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त सिमेंटचे खाब रुक्ष दिसतील, त्याऐवजी स्थानकाला शोभून दिसतील म्हणून त्याच्यावर आता अशा कुंड्या लावण्यात येणार आहेत. मेट्रोच्या प्रत्येक स्थानकामध्ये पुणे शहराची वैशिष्ट्ये दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्यातूनच एका स्थानकाला बाहेरच्या बाजूने पगडीचा आकार तर दुसऱ्या स्थानकाला विणेचा आकार देण्यात आला आहे. दुरवरून पाहिल्यावर स्थानकाचे हे आकार लगेचच लक्षात येतील अशी त्याची रचना करण्यात येणार आहे. त्याचे आरेखनही तयार करण्यात आले आहे. ते करताना ज्याठिकाणी स्थानक असेल तिथे त्याला अनुसरून आकार देण्यात येणार आहे. मेट्रोचे खांब मेट्रो मार्गावरील रस्त्याच्या बरोबर मध्यभागी आहेत. दोन खांबांमध्ये साधारण २३ ते २७ मीटरचे अंतर आहे. त्यामधून वाहनांची ये-जा होऊ नये यासाठी ही जागा दुभाजकाने बंद करण्यात येणार आहे. एरवीच्या रस्त्यावर असतो तसा हा दुभाजक नाही. तो उंच व रुंदीने कमी असा आहे. त्याच्या मधील जागेत फ्लॉवर बेड ( फुलझाडे) तयार करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. संपुर्ण मेट्रो मार्गावरच असे शोभीवंत दुभाजक तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो