वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:12 IST2021-09-22T04:12:16+5:302021-09-22T04:12:16+5:30
अर्जुन गोविंद आडे (वय ३६ रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस ...

वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले.
अर्जुन गोविंद आडे (वय ३६ रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेली माहिती अशी, मंचर गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर वाळू भरलेला टेम्पो जाणार असल्याची माहिती एकाने पोलिसांना कळविली होती. त्यानुसार पोलिसांनी या मार्गावर सापळा लावला होता. त्यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द गावात भरधाव वेगाने टेम्पो (एम एच ०४ एफ.यु ७७८७) आला, त्याला थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला मात्र तो थांबला नाही त्यामुळे पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करुन अडविला व टेम्पो चालक अर्जुन आडे याला ताब्यात घेतल्यावर त्याने दोन ब्रास वाळू रॉयल्टी न भरता घेऊन चालल्याचे कबूल केले तो टेम्पो मालक अनिकेत मधुकर मोरे (रा. घारगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे करत आहेत.