खोदलेले रस्ते न बुजविल्यामुळे वाहने अडकली खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:04+5:302021-07-15T04:09:04+5:30

नवीन होणाऱ्या पाणी योजनेची पाईपलाईन व चेंबर टाकण्यासाठी मधोमध शहरातील रस्त्यावर खोदाई दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. पाईप गाडण्यात आले. ...

Vehicles stuck in potholes | खोदलेले रस्ते न बुजविल्यामुळे वाहने अडकली खड्ड्यात

खोदलेले रस्ते न बुजविल्यामुळे वाहने अडकली खड्ड्यात

नवीन होणाऱ्या पाणी योजनेची पाईपलाईन व चेंबर टाकण्यासाठी मधोमध शहरातील रस्त्यावर खोदाई दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. पाईप गाडण्यात आले. खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात आली नाही. पाऊस पडल्याने रस्ता खचत आहे. त्यात जड वाहने आल्यास वाहन खड्ड्यात खचून अडकून पडत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे. यांचा मनस्ताप व्यापारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतेक रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. तसेच पाबळ चौक ते चव्हाणमळा या खेड कनेरसर रस्त्यालगत गॅस लाईन खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथील रस्ता व्यवस्थित व पूर्ववत न केल्यामुळे सध्या पाऊस सुरू झाल्याने वाहने खचत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावरच एक मालवाहतूक वाहन खचल्याने या रस्त्यावर वाहतूक बराच काळ विस्कळित झाली होती. नागरिकांना व व्यापारी वर्गाला याचा फटका बसला. पाणी योजनेचे पाईप गाडण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्वरित मंजूर रस्ता होणे गरजेचे होते. परंतु ते केले गेले नाही. नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये खोदाई केलेला रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती न केल्यामुळे खड्ड्यात अशी वाहनाची चाके रुतून बसली होती.

Web Title: Vehicles stuck in potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.