शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या घुसखोरीने धोका

By admin | Updated: July 10, 2015 01:43 IST

गतिमान व सुरक्षित प्रवासाची हमी देणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग त्यावरील सुरक्षा कुंपण तोडून होत असलेल्या धोकादायक घुसखोरीमुळे धोकादायक वाटू लागला आहे.

तळेगाव स्टेशन : गतिमान व सुरक्षित प्रवासाची हमी देणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग त्यावरील सुरक्षा कुंपण तोडून होत असलेल्या धोकादायक घुसखोरीमुळे धोकादायक वाटू लागला आहे.द्रुतगती महामार्गावर निर्धास्तपणे वाहन चालवावे अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. कारण आजुबाजूच्या खुश्कीच्या घुसखोरीच्या मार्गाने कोण कधी अचानक समोर येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रावेतपासून सुरू होणारा ९४.५ किमी लांबीचा हा जलद, सुरक्षित व निर्धास्त प्रवासाकरिता नावाजला गेलेला द्रुतगती महामार्ग आता अपघात व असुरक्षितता यासाठी गाजत आहे. याला आयआरबी कंपनी आणि वाहतूक पोलिसांच्या ढिलेपणाबरोबरच बेशिस्त चालक आणि मार्गालगतचे स्थानिक रहिवासी कारणीभूत आहेत. या सर्वांचा निष्काळजीपणा स्वत:बरोबरच इतरांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरतो आहे. सुस्थितीत नसलेली वाहने, रिफ्लेक्टर वा इंडिकेटर नसलेले ट्रेलर व ट्रक, लेन तोडून चालणारे बेदरकार चालक, अतिवेग, रस्त्यावर अडथळा येईल अशी वाहने थांबविणे ही मुख्य कारणे द्रुतगती मार्गावरील बहुतांश अपघातांमागे आहेत. तरी मार्गाशेजारचे सुरक्षाकुंपण भेदून दुचाकीस्वार, टोल चुकविणारी छोटी-मोठी वाहने व पाळीव प्राणी अचानक समोर प्रकट होतात तेव्हा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.या महामार्गावर कोठेही थांबण्यास बंदी असताना लगत उभे केलेले क्रेन, अडथळा होईल या पद्धतीने टोलनाक्यासमोर तासन्तास उभे राहणारे वाहनचालक, मोकाट व बिनधास्त विहार करणारे दुचाकीस्वार, टोलनाक्यासमोरून रस्ता ओलांडण्यासाठी अचानक वळणारी वाहने, विरुद्ध बाजूने येणारे बेशिस्त वाहनचालक या व अशा प्रकारच्या निष्काळजीपणाचा कळस सध्या अपघातास कारणीभूत ठरत आहे.उर्से टोलनाक्यावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या मुख्य लेनवर, पोलीस चौकीसमोरच अनेक छोटी-मोठी वाहने तासन्तास धोकादायक पद्धतीने उभी केलेली ना समोरच्या महामार्ग पोलिसांना दिसतात ना डेल्टा फोर्सला ना आयआरबीवाल्यांना. टोलनाक्यावर उलट दिशेने गाडी घुसवून अचानक वळणाऱ्या वाहनचालकांना आयआरबीवाले आपत्कालीन गेट उघडून रस्ता देतात. द्रुतगती महामार्गालगत असणाऱ्या मावळ तालुक्यातील गहुंजे, उर्से, ओझर्डे, बऊर, ब्राह्मणवाडी, पिंपळोली, सडवली, आढे, बोरज या गावांतील स्थानिकांनी स्वत:च्या सोईसाठी ठिकठिकाणी कुंपण तोडून महामार्गावर घुसण्यासाठी रस्ते पाडले आहेत. या खुश्कीच्या मार्गावरून अचानक समोर अवतरणारे दुचाकीस्वार आणि इतर छोटी-मोठी वाहने भीषण अपघातास कारणीभूत ठरत आहेत. (वार्ताहर)कर्मचाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन> आयबारबी, डेल्टा फोर्समध्ये काम करणारे बरेचसे कर्मचारी हे द्रुतगती मार्गालगतच्या गावातील आहेत. ते सर्रास अशी घुसखोरी करताना दिसतात. त्यामुळे महामार्गावरून टोल भरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. आयआरबी, डेल्टा फोर्स व पोलीस यापैकी कारवाईसाठी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, असा प्रश्न आहे. आता सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरणानेच यासाठी आयआरबीवर दबाव आणायला हवा आणि असे मार्ग त्वरित बंद करून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. > सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी द्रुतगती मार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश आयआरबीला दिले आहेत. त्यात ही धोकादायक ठिकाणे असायला हवीत, अशी प्रवाशांना अपेक्षा आहे.