शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वीर धरण ९७.८३ टक्के भरले; १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 14:47 IST

आता नीरा दुथडी वाहणार...

नीरा (पुणे) : नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही. परिणामी शनिवारी दुपारी भाटघर धरण ५३.९३ टक्के, नीरा देवधर ४६.५३ टक्के, वीर धरण ९७.८३ टक्के, तर गुंजवणी धरण ७३.५१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाच्या चार दरवाजे एक फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 

शुक्रवारी सकाळपासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १ हजार ४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रात्रभर नीरा नदीपत्रात एकून ६ हजार १६८ क्युसेक्सने विसर्ग सुरु होता.

आज (शनिवारी) दिवसभर संतधारा सुरुच आहेत. वीर धरणात पाणी वाढतच आहे. शनिवारी दुपारी वीर धरण ९७.८३ टक्के भरले आहे. तसेच धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने शनिवारी दुपारी ४ वाजता ९ हजार १४४ क्युसेक्सने विसर्गात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पात्रात दुपारी चार नंतर १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नीरा नदी दुथडी भरुन वाहणार असुन नदीचे सर्व बंधारे भरणार आहेत.

सध्या वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ६१६८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे ९ हजार १४४ क्सुसेक विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण १५ हजार ३१२ क्युसेक विसर्ग राहील. आज दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणPurandarपुरंदर