शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वासंती काकडे अध्यक्षपदी

By admin | Updated: August 18, 2015 03:57 IST

शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वासंती काकडे यांची बहुमताने सोमवारी निवड झाली. तर भाजपाच्या मंजूश्री खर्डेकर यांचा पराभव झाला

पुणे : शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वासंती काकडे यांची बहुमताने सोमवारी निवड झाली. तर भाजपाच्या मंजूश्री खर्डेकर यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदस्याने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता तटस्थ भूमिका घेतली, तर मनसेच्या दोन सदस्यांनी अनुपस्थित राहून निवडणुकीवर बहिष्कार टाकला. शिक्षक बदली प्रकरणीनंतर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून वासंती काकडे आणि लक्ष्मीकांत खाबिया यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या समर्थक असल्याने काकडे यांना संधी मिळणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी निवडणूक झाली. त्या वेळी काकडे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांची मिळून ९ मते मिळाली. तर भाजपाच्या उमेदवार मंजूश्री खर्डेकर यांना शिवसेना तटस्थ राहिल्याने केवळ ३ मते मिळाली. त्यामुळे काकडे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेते बंडू केमसे, काँग्रेस शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.