शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वसंत मोरेंची आज महाआरती, राज ठाकरे येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 13:31 IST

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे माध्यमांना अनरिचेबल होते...

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यभरात चार मे रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होते. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक मनसैनिकांची पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील करण्यात आली होती.

दरम्यान पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे नेमके याच दिवशी तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. राज ठाकरेंनी ठरवलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळण्यासाठी वसंत मोरे तिरुपतीला गेल्याचे देखील आरोप करण्यात आले होते.

परंतु हे सर्व आरोप फेटाळत वसंत मोरे यांनी आज महाआरतीचे आयोजन केले आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील त्यांच्या प्रभागात आज सायंकाळी सहानंतर ही महाआरती होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या या महाआरतीला राज ठाकरे हजेरी लावणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून अनरिचेबल असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यापूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. मोरे यांनी एक वॉट्सअप स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये, तुम्हाला जर विरोध किंवा संघर्षाला सामारे जावे लागत नसेल तर तो रस्ता बदलावा, या आशयाचे स्टेटस मोरे यांनी ठेवले होते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेkatrajकात्रज