शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वसई, विरारचे रस्ते गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:59 IST

शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते.

वसई - शुक्रवारपासून कमी जास्त स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने वसईच्या शहरी व ग्रामीण भागात शनिवारी पूरस्थिती निर्माण केली असून तेच चित्र रविवारीही कायम होते. पावसाचा जोर कमी जास्त असला तरी रिपरिप सुरुच होती. अधुन मधुन उघडीप देणाऱ्या सरींचा जोर सायंकाळनंतर वाढला होता.वसई-विरार परिसर पुर्णपणे जलमय झाला असून मुख्य रस्त्यांना नद्यांचे व काही भागात डबक्याचे स्वरूप आले आहे. समाधानाची बाब म्हणजे धरणे तुडूंब भरुन वाहत आहेत. वसईतील नवघर माणिकपूर भागात प्रामुख्याने उमेलमान, चुळणे भागात गुढगाभर पाणी साचले आहे. वसई गावात एस टी डेपो परिसर, किल्लाबंदर, पाचूबंदर तर तिकडे वासळई, तर्खड , निर्मळ तर पार्वती क्रॉस मधील मैदान पूर्ण स्विमिंग पूल झाले होते.यामध्ये वसई पूर्व भागातील सातिवली, गोखिवरे, महामार्ग भाग तर आद्योगिक वसाहतीत पाणी भरल्याने रविवारी कंपनीत जाणाºया कामगारांचे पूर्ण हाल झाले. याचा विपरीत परिणाम वसई पूर्व-पश्चिम वाहतुकीवर झाला. दुसरीकडे विरार मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. ऐन पावसाळ्यात वसई सहित नालासोपारा विरार भागातील एस टी स्थानक व रेल्वे स्टेशन नजीक पाणी साचून राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या रस्त्यावर नोकरदार मंडळी, व्यापारी यांचे मात्र सतत पडणाºया पावसाने पुरते हाल केले होते. विरार मधील बºयाच ठिकाणी पश्चिम पट्टा, बोळींज, आगाशी पूर्व भागातील मनवेल पाडा, कारगिलनगर, मोरेगाव, एम बी इस्टेट, विवा कॉलेज परिसर आदी भाग संपूर्ण जलमय झाला होता.या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींनी शहर रचनेला फाटा दिल्याने जागोजागी पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे वसई आणि विरार च्या तुलनेत सर्वत अधिक पावसाचा फटका नालासोपाराभागाला बसतो. पूर्व सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, तुळींज, टाकीपाडा, नालासोपारा बस आगार, संतोष भुवन, नागिनदास पाडा आदी वस्त्यांमध्ये पाणीच पाणी होते तर बहुतांशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. यामध्ये व्यापारी व त्यांची दुकाने, गोडावून यामधील वस्तू, फर्निचर आदींचे मोठे नुकसान झाल्याची ओरड ऐकावयास मिळाली. एकूणच शनिवार-रविवार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची फरफट वाचली.दरम्यान, शहरातुन होणारी रिक्षाची वाहतूक व दुचाकी यांना रविवारचा दिवसही डोके दुखीचा ठरला. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खाड्या बंद पडल्या होत्या.विरारमधील पापडखिंड धरण ओव्हरफ्लोआधीच कमी पाणी साठवणुकीची क्षमता असलेले विरार नजीकचे पापडखिंड हे धरण दोन दिवस पडत असलेल्या पावसाने मात्र ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे.दरवर्षी अगदी डिसेंबरमध्येच या धरणातील पाण्याची पातळी खाली जात असते. मात्र, या वर्षीपासून एक वेगळे तांत्रिक कारण देत महापालिकेने हे पापडखिंड धरण नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून बंद केले आहे.नवघर-वसई रोड बस आगारात तळेच तळेसालाबादप्रमाणेवसई रोड रेल्वे स्टेशनजवळील बस आगारात पावसामुळे मोठाले तळे झाले असून गुडघाभर पाण्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यातच याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्थाच नसल्याने दरवर्षी पालिका व एस टी महामंडळ यांच्यात साफसफाईवरून वाद निर्माण होत असतो.मात्र तरीही या पाण्यातून वाट काढूंन लोकांना पुढे जावे लागते. ही परिस्थिती अशीच कायम आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस