शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 21:36 IST

ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुणे : बंदी असलेल्या सी़ पी़ आय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेले ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांचा गेली अनेक वर्षे भूमिगत असलेला नक्षलवादी गणपती याच्याशी संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले असून मणिपूर, नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट रचण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी रविवारी न्यायालयात सांगितले. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी वरवरा राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.     पुणेपोलिसांनी अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वरवरा राव हे राहत्या घरी नजरकैदेत होते. नजरकैदेची मुदत वाढवून देण्याबाबतचे त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री राव यांना पुन्हा अटक केली. हैदराबाद येथून त्यांना रविवारी सकाळी पुण्यात आणून न्यायालयासमोर हजर केले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. राव यांच्या कडून जप्त करण्यात आलेल्या ई मेलमध्ये त्यांनी गणपती या व्यक्तीला ईमेल पाठविले आहेत. हा गणपती कोण आहे?, याचा शोध घ्यायचा आहे़  कटाचा भाग म्हणून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे भारतात कोणत्या कारवाया सुरू आहेत याचा तपास करायचा आहे. अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे डिसेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे हल्ला झाला होता. त्याला देशभर प्रसिध्दी मिळाली होती. अशा प्रकारच्या घटना घडविण्याकरीता वरावर राव यांनी निधी उपलब्ध करून दिला. उसुर, पामेद आणि भेजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहशतवादी कृत्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला आहे. राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेले ईमेल संदेशांचा तपास करणे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमध्ये सांकेतिक भाषेचा वापर झाला आहे. ती सांकेतिक भाषा समजावून घेवून ते संदेश नक्की काय आहेत याचा शोध घ्यायचा आहे़ अशा याचाही तपास करायचा असल्याने राव यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी केली.        बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. रोहन नहार, अ‍ॅड. राहूल देशमुख यांनी काम पाहिले. राव यांना पोलिसांनी शनिवारी केलेली अटक ही दुसरी अटक आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, कॉम्पुटर, हार्डडिक्स सह इतर कागदपत्रे जप्त केलेली आहेत. पोलिस एका बाजूला सांकेतिक भाषांचा वापर केला आहे असे सांगताना त्याबाबत तपास करायचा असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे गणपतीला ईमेल पाठविल्याचे म्हणते. त्यामुळे पोलिसांकडून दाखल केलेले पुरावे विश्वासार्ह नाही. एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांचा सहभाग होता. मग त्यांच्याकडे का पोलिसांनी तपास केला नाही?. त्यामुळे राव यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करावी, अशी मागणी अ‍ॅड. नहार यांनी युक्तीवादा दरम्यान केली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्या नंतर न्यायालयाने राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिसCourtन्यायालय