शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२१६ कोटी रुपयांचे बँक फ्रॉड प्रकरण : सुरतचा वरुण, पुण्याची अनघा मास्टर माईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 21:08 IST

राजेश शर्मा, परमजितसिंग संधुसह अनघा मोडक अटकेत

पुणे : डॉरमंट (निष्क्रीय) खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्याची विक्री करुन त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या कटाचे मास्टर माईंड सुरतचा वरुण वर्मा आणि पुण्याची अनघा मोडक हे दोघे असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, औरंगाबादचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु तसेच अनघा अनिल मोडक (वय ४०, रा. वडगाव) यांना पोलिसांनी आज अटक केली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सायबर पोलिसांनी काल ८ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील आणखी तिघांना आज अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला डेटा हा त्यांनी गुजरात, सुरत व हैदराबाद येथून मिळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके परराज्यात रवाना करण्यात आली आहेत.

अनघाला हवे होते अडीच कोटी रुपयेयाबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, अनघा मोडक ही शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करत होती. मात्र, गेल्या काही काळात तिचा व्यवसाय बंद पडला होता. एकमेकांच्या माध्यमातून या सर्वांचा परिचय झाला असल्याचे ते पोलिसांना सांगत आहेत. वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे. चोरीच्या डेटावरुन बँक खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढून देण्याची जबाबदारी अनघा हिने घेतली होती. त्यातून तिने हा डेटा विकत घेणाऱ्यांचा शोध घेत होती. तिला काही जण तसेच भेटलेही होते. मात्र, तिला त्यातून अडीच कोटी रुपये हवे होते.

राजेश शर्मा आणि परमजित संधु यांचा प्रकरणात प्रवेशडेटा विकत घेऊन तो हॅकर्सच्या मदतीने खात्यातील पैसे मिळविण्यासाठी अनघा अशा काही हॅकर्सच्या संपर्कात होती. त्यातूनच तिची औरंगाबादच्या विशाल बेंद्रेशी ओळख झाली. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. त्याच्या मार्फत राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु यांच्याशी संपर्क झाला. डेटाच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांपैकी काही पैसे औरंगाबाद येथील एएम न्यूजचे संचालक राजेश शर्मा आणि परमजित संधु या दोघांना हवे होते. त्यासाठी अनघा त्यांच्याकडे अडीच कोटीची मागणी करत होती. मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे २५ लाखात त्यांना तो व्यवहार करून हवा होता. पैसे घेऊन शर्मा व संधु दोघे पुण्यात आले होते. पोलिसांनी सिंहगड रोडवरील भटेवरा याच्या घरासमोर यातील सर्वांना पकडले. तेव्हा इतरांबरोबरच शर्मा आणि संधु हेही हेही होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आज अटक केली आहे.

राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे दोघेही सध्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळेच त्यांचे न्यूज चॅनेल बंद पडले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात त्यांचा अनघाशी संपर्क झाला होता. तिच्याकडून डेटा घेऊन ते औरंगाबादमधील एकाला पुढे विकणार होते. तसेच हॅकर्सच्या मदतीने या खात्यांमधील पैसा काढून घेण्याचा त्यांचा कट होता.टोळीतील प्रत्येकाचा रोल होता वेगळा

या टोळीचे मास्टर माईंड वरुण आणि अनघा असून त्यांनीच सर्वांना एकत्र केले होते. वरुणसह इतर तीन इंजिनिअर यापूर्वी गुरगाव येथील एका डेटा स्टोअर करणार्या कंपनीत एकत्र काम करत होते. या डेटाद्वारे खात्यातून पैसे काढण्याचे काम झाल्यावर त्या सर्वांना कोणाला एक टक्का तर कोणाला आणखी काही टक्के मोबदला मिळणार होता.पोलीस बनले हॅकर्स

डेटा मिळल्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन खात्यातील पैसे मिळवण्यासाठी अनघा मोडक हिला हॅकर्सची गरज होती. त्यासाठी ती हॅकर्सचा शोध घेत होती. ही खबर सायबर पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांनी स्वत: हॅकर्स बनून तिची भेट घेतली. तिला आपल्या जाळ्यात ओढले. मात्र, इतर आरोपींनाही पुण्यात आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. जोपर्यंत अडीच कोटी देणार्यांची मिळत नाही, तोपर्यंत ती सर्वांना पुण्यात एकत्र आणायला तयार नव्हती. हॅकर्स बनलेले पोलीस तिच्याबरोबर सतत थांबून सर्व माहिती वरिष्ठांना पाठवत होते. दोन दिवस हॅकर्स पोलीस अनघाच्या गाडीतून फिरत होते. पण, अधिक दिवस थांबल्यास हे भांडे फुटण्याची शक्यता होती. त्यातून शर्मा आणि संधू हे २५ लाख रुपयांची सोय करुन पुण्यात येत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्लॅन आखून त्यांना सर्वांना पकडले. त्याचवेळी दोघांना मुंबई व एकाला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले...............

या आरोपींकडे मिळालेला २१६ कोटी रुपयांचा डेटा हा केवळ ५ खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रीयही आहे. यातील काही आरोपींनी आपण प्रथमच अशा प्रकरणात पडल्याचे सांगितले. तर दोघा तिघांनी आम्ही यापूर्वी अशा प्रकारचे काम केल्याचे सांगितले आहे. त्याचा तपास करण्यात येत आहे. ज्यांची ही खाती आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरु आहे. यातील आणखी काही सुत्रधार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार अधिक सुस्पष्ट होईल. यात काही बँकेशी संबंधितांचाही हात असण्याची शक्यता आहे.पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकbankबँक