लष्कर परिसरात बुद्धजयंतीनिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST2021-05-28T04:08:51+5:302021-05-28T04:08:51+5:30

लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पेन्शनर्स पंचायत, भीम सेवा समाज, सिद्धार्थ तरुण मंडळ, डायमंड स्टार मंडळ, मिलिंद सामाजिक व ...

Various activities on the occasion of Buddha Jayanti in the army area | लष्कर परिसरात बुद्धजयंतीनिमित्त विविध उपक्रम

लष्कर परिसरात बुद्धजयंतीनिमित्त विविध उपक्रम

लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पेन्शनर्स पंचायत, भीम सेवा समाज, सिद्धार्थ तरुण मंडळ, डायमंड स्टार मंडळ, मिलिंद सामाजिक व क्रीडा मंडळ, सिद्धार्थ सेवा मंडळ, नवमत तरुण मंडळ, भीम युवक संघ, सुप्रिया बुद्ध विहार, सोलापूर बाजार बुद्ध विहार, संघर्ष ग्रुप आणि इतर सर्व मंडळांच्या वतीने बुद्धजयंतीच्या पार्श्वभूमीवर रेशनवाटप, गरिबांना अन्नदान, खीरवाटप, अत्यावश्यक सामानाचे वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप अशी विविध समाजोपयोगी विधायक कार्यक्रमाद्वारे बुद्धजयंती साजरी करण्यात आली.

मिलिंद सामाजिक व क्रीडा मंडळाच्या वतीने नागरिकांना मोफत वाफेच्या यंत्राचे वाटप, तसेच मंडळाच्या कार्य अहवालाचे उद्घाटन करण्यात आले.

सिद्धार्थ तरुण मंडळ व दीपक निकाळजे सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धविहारात कोरोनाचा नियम पाळत बुद्धवंदना घेण्यात आली व १०० लिटर खीरवाटप करण्यात आली. याप्रसंगी आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.

भीम युवक संघाच्या वतीने सॅलेसबरी पार्क येथील अनाथ आश्रमात धान्य वाटण्यात आले. भीम सेवा समाजच्या वतीने बुद्धवंदना व मिठाई वाटप करण्यात आली.

Web Title: Various activities on the occasion of Buddha Jayanti in the army area