श्रीक्षेत्र रामदरा नजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST2021-04-02T04:11:03+5:302021-04-02T04:11:03+5:30
गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटला. त्यावर ५ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ ...

श्रीक्षेत्र रामदरा नजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा
गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटला. त्यावर ५ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ हेक्टर परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आता काळा राखेने माखला आहे. नजर पोचेल तेथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे.
वणवा लागल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय पुणेचे वनपाल वाय. यू. जाधव हे वनरक्षक बळीराम वायकर, ए. आर. गायकवाड, लहू पारखे, व्ही. टी. यादव, ए. व्ही. राठोड, एम. बी. गोडगे, गणेश म्हस्के तसेच वनकर्मचारी डी. एल. कोळपे, एस. वाय. कुंजीर, बी. डी. बाजारे, डी. एन. शिवले आदी तत्काळ सदर ठिकाणी पोहोचले व फ्लो ब्लोअर मशीन, पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवली. परंतू त्यापूर्वीच येथील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली होती. तसेच या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्षांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.