शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'पीएमपी' संचालकांच्या कार्यालयात राडा? स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 23:28 IST

महापौरांच्या सोबत असणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. 

पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकाने दिलेल्या पीएमपीएमएलच्या संचालकपदाच्या राजीनाम्यामुळे पक्षात वाद उफाळून आला असतानाच पीएमपी कार्यालयात नव्या वादाला तोंड फुटले आहेे. १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आणण्याकरिता पीएमपी कार्यालयात गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकात छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, महापौरांच्या सोबत असणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. 

भाजपाचे नगरसेवक असलेले शंकर पवार हे पीएमपीएमएलचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देण्यास सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले होते. त्यानुसार हा राजीनामा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून महापौरांकडे आला होता. तो पुढे पीएमपीकडे देण्यात आला. मात्र, १ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौरांनी या अर्जाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राजीनामा नामंजूर करीत संचालक मंडळाकडे नव्याने देण्याची सूचना केली. त्यावरून सभागृह नेते बिडकर आणि महापौर मोहोळ यांच्यामध्ये बुधवारी जोरदार खडाजंगी झाली होती. हा वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत गेला. पाटील यांनीही राजीनामा मंजूर न झाल्याने संताप व्यक्त केला. त्यांनी बैठकीचे इतिवृत्त (मिनिट्स) मागविले होते.  

दरम्यान, बैठकीचे इतिवृत्त घेण्यासाठी महापौर मोहोळ,  कैलास त्रिवेदी आणि राहुल ताथवडे हे तिघे पीएमपी कार्यलयात गेले होते. यावेळी तेथे मोठा वाद झाला. शिवीगाळ आणि तोडफोडीपर्यंत प्रकरण केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.  दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही बाजूंचे जबाब पोलीस नोंदविणार आहेत.-----पीएमपीच्यावतीने रखवालदार नाईक आरिफ हुसेन तांबोळी यांनी तक्रार दिली आहे. कैलास त्रिवेदी आणि राहुल ताथवडे या दोघांनी पीएमपी सीईओच्या दालनातील त्यांचा वैयक्तीक संगणक चालू करण्याचा प्रयत्न केला. तसेच औद्योगिक शांतता भंग केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.-----कैलास त्रिवेदी यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये राजेंद्र जगताप यांच्या सांगण्यावरूनच आपण पीएमपी कार्यालया थांबलो होतो. त्यांनी फोनवरून मिनिट्स देणार नाही असे म्हणत शिवीगाळ केल्याचे आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.-----शुक्रवारी घडलेल्या या प्रकारावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात घुसून संगणकात होणारी छेडछाड थांबविण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘पीएमपी’च्या कर्मचार्‍यांना महापौर व इतरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. -----------शंकर पवार यांच्या राजीनाम्यानंतर पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपा बिथरलेली असून बैठकीमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपच्या या दादागिरीची ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे.- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-------

पीएमपी संचालक मंडळाच्या १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इत्तीवृत्त आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. मी शंकर पवार यांच्या दालनामध्ये बसलो होतो. राजेंद्र जगताप कार्यकायात नव्हते. बैठकीचे इत्तीवृत्त त्यांच्या घरी असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यामार्फत पाठवितो असे सांगितले. दोन कार्यकर्ते त्याकरिता थांबले. मी लगेच पीएमपी कार्यालयातून निघून गेलो.यानंतर दोन तासांनी याठिकाणी पोलिसच आले. या ठिकाणी उपस्थितांनी योग्य भाषेचा वापर केला नाही. राजेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. धमकी दिली. ते अशा प्रकारे का वागले मला माहित नाही. महापौरांसोबत वागण्याची ही पद्धत नव्हे.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरPMPMLपीएमपीएमएलBJPभाजपा