शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: 'मीच या वस्तीचा दादा', पुण्यातील सहकारनगर परिसरात भरवस्तीत गुंडांचा धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 10:59 IST

परिसरात हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत "मीच इथला दादा आहे" असे बोलून दहशत निर्माण केली

पुणे : पुण्यातील सहकार नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती. या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 19 आणि 16 वर्षीय तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन 'या वस्तीचा दादा मीच' म्हणत दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. बुधवारी दुपारच्या सुमारास धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत परिसरात ही घटना घडली. 

याप्रकरणी कृष्णा सुभाष वैराळ (वय 19, रा. दिग्विजय कॉलनी, लेन नं 4, संतोष नगर कात्रज) त्याच्यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महाराज वसाहत परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी एकमेकाच्या घराशेजारी राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला "मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो" असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीवरून वार केला. परंतु हा वार चुकून फिर्यादी घरात पळून गेले. त्यानंतर आरोपीने या परिसरात असणाऱ्या पाच दुचाकी आणि एक चार चाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत "मीच इथला दादा आहे" असे बोलून दहशत निर्माण केली. त्याचा हा रुद्रावतार बघून वस्तीतील नागरिक लपून बसले होते.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक