शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro | वनाझ ते शिवाजीनगर मेट्राे लवकरच ट्रॅकवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 20:05 IST

मेट्रो स्थानकांच्या कामांना गती...

पुणे : वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या पुणेमेट्रोच्या रिच २ मार्गातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट या स्थानकांची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत.

त्यामुळे लवकरच वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा मेट्रो प्रवास सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

वनाज ते सिव्हिल कोर्टदरम्यानचे पिलर यापूर्वीच उभे राहिले असून, रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या सेग्मेंट व व्हायाडक्टचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर आता विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची पाहणी नुकतेच डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली. या स्थानकांसोबतच अन्य कामेही वेगाने पूर्ण करून येत्या काही महिन्यांत वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो धावू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वनाज ते सिव्हिल कोर्ट मेट्राे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. यात गरवारे ते सिव्हिल कोर्ट दरम्यान सध्या रूळ (ट्रँक) आणि विद्युत खांब, सिग्नल लावण्याचे काम सुरू आहे. स्थानकांचेही काम गतीने केले जात आहे. लवकरच ते पूर्ण होईल आणि वनाज ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर पुणेकरांना मेट्रोचा लाभ घेता येईल.

मेट्राेची सद्यस्थिती

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांची एकूण लांबी ३३.२ कि.मी. असून यात ३० स्थानके आहेत. यातील ५ स्थानके भूमिगत व २५ स्थानके उन्नत आहेत. पुणे मेट्रोने यात रिच १ (पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक), रिच २ (वनाझ स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक), रिच ३ (रामवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक) त्याचबरोबर भूमिगत मार्ग १ (स्वारगेट स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक) आणि भूमिगत मार्ग २ (रेंज हिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक) अशी कामे केली आहेत. यातील वनाज ते सिव्हिल कोर्ट या रिच २ मार्गावरील पूल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून हे अंतर ७.५०५ कि.मी. आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्र व राज्य सरकार, पुणे महापालिका अन्य सरकारी कार्यालय व प्रामुख्याने पुणेकर नागरिक यांच्या सहकार्यामुळे मेट्रोच्या कामाला गती देणे शक्य होत आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड