शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:01 IST

निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

पुणे -वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सहआरोपी म्हणून समोर आलेल्या निलेश चव्हाण याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या बाजूने ऍड. स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली. २४ तासांची मुदत पूर्ण होण्याआधीच आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, निलेश चव्हाण याचा या प्रकरणातील सहभाग अत्यंत गंभीर असून, तपासासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्यक आहे. आरोपीकडे मृत वैष्णवी हगवणेचा मोबाईल व डेटा असून तो डिलिट करण्यात आला आहे; तो डेटा रिकव्हर करायचा आहे. करिष्मा व शशांक हगवणे यांचे मोबाईल फोनही आरोपीकडे असून ते अद्याप सापडलेले नाहीत. चव्हाणकडे शस्त्र परवाना आहे; त्याचा वापर करून वैष्णवीला धमकावण्यात आले असण्याची शक्यता आहे.

निलेश चव्हाण व हगवणे कुटुंबातील सदस्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याचा तपास होणे गरजेचे आहे. आरोपी पळून गेला होता, त्याला मदत कोणी केली, कुठल्या मार्गाने तो पोहोचला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याच्याकडे मुलाचे पालकत्व नसताना बालक का ठेवण्यात आले, याचा देखील तपास आवश्यक आहे. आरोपीचा मोबाईल सीडीआर (Call Detail Record) मिळवणे गरजेचे आहे. तर बावधन पोलिसांनी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे.

आरोपीच्या बाजूने कोर्टात ऍड. स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टात सांगितले की,केवळ बाळ त्यांच्या ताब्यात असल्याने आरोपीचे नाव या प्रकरणात घेण्यात आले.चव्हाणकडे शस्त्र आहे, मात्र त्याचा वापर कुठेही झालेला नाही. आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक आहेत, सर्व कलमे जामीनपात्र आहेत. फक्त आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे; त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी