शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case: हगवणेंचे जेसीबी मशीन ताब्यात घेणारा रिकव्हरी एजंट कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:49 IST

आर्थिक फसवणूकप्रकरणी महाळुंगे पोलिसांकडून होणार चौकशी

पिंपरी : जेसीबी मशीन व्यवहारातील आर्थिक फसवणूकप्रकरणी बँकेचा रिकव्हरी एजंट कोण होता, त्याने बँकेला माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया करून जेसीबी मशीन ताब्यात घेतले होते का, याचा तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित एजंटकडे महाळुंगे एमआयडीसी पोलिस चौकशी करणार आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेला तिचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी हा जेसीबी खरेदीचा व्यवहार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, पोलिसांनी शशांकचा जबाब सादर करून पोलिस कोठडीची मागणी केली. रिकव्हरी एजंटने अनधिकृतपणे जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रिकव्हरी एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे.

पोलिसांनी न्यायालयात मांडलेली भूमिका- जेसीबी मशीन खरेदीचा व्यवहार नोंदणीकृत करण्याऐवजी त्याची ‘नोटरी’ केली. त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही याचा तपास करायचा आहे.

- प्रशांत येळवंडे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे शशांक आणि लता हगवणे यांनी केले, ते पैसे कुठे गेले याबाबतही तपास करायचा आहे.- येळवंडे यांच्या ताब्यात असलेले जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याची शंका आहे. याबाबत संबंधित बँकेला माहिती नसल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संबंधित रिकव्हरी एजंट कोण आहे याबाबतही शशांक आणि लता हगवणे यांच्याकडे चौकशी करायची आहे.

जेसीबी मशीनचा व्यवहार फक्त भाडेतत्त्वावर झाला असल्याचा युक्तिवाद खेड न्यायालयात हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. त्यामुळे ही आर्थिक फसवणूक म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. यावर महाळुंगे पोलिसांनी शशांकचा जबाब न्यायालयाकडे सादर केला. मे २०२४ मध्ये हा जबाब नोंदवण्यात आला होता. जेसीबी खरेदीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे शशांकने दिलेल्या जबाबात नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे