शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:56 IST

वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती.

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी फरार नीलेश चव्हाण याला शुक्रवारी पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना दहा दिवसांनी यश आले. नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणे, चुलत्यांसह इतरांना धमकावणे याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता. वाकड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती.वाकड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती.

अशात बाल कल्याण समितीने वैष्णवीचे बाळबाबत महत्वाची माहिती दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिली आहे की,-पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.तत्पूर्वी, हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (२७), सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (२७) या पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली आहे. त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. तर आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला होता. सोन्याबाबतची माहिती स्वतः पोलिसांना दिली : बचाव पक्षसोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वीच आरोपींनी स्वतःहून पोलिसांना दिली आहे. व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. आपले सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवी यांनी केलेली नाही. त्यांचे एका तरुणासोबतचे चॅटिंग शशांक यांना मिळाले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते, याबाबत तपास पोलिसांनी केलेला नाही, असा युक्तिवाद ॲड. दुशिंग यांनी केला होता.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे