शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...

By किरण शिंदे | Updated: May 29, 2025 11:21 IST

पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे.

अशात नांदेड सिटी पोलिसांना नुकताच दिलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवले आहे. असा खोटा फोन ११२ या आपत्कालीन क्रमांकावर करून नांदेड सिटी पोलिसांना गाफील करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांचा ताफा घटनास्थळी धाव घेत असतानाच हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे उघड झाले.खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवले आहे. त्याच्याकडे दोन पिस्तुलं आहेत आणि आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे. या माहितीवर विश्वास ठेवून पोलिसांनी तात्काळ पथक पाठवले.मात्र चौकशीदरम्यान असे निदर्शनास आले की, फोन करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली होती. आरोपीची ओळख संतोष दत्तात्रय गायकवाड (वय ३३, रा. किरकटवाडी) अशी झाली असून, तो स्वागत हॉटेल (पानशेत रस्ता) येथे सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खोटे कॉल केल्याची कबुली दिली. अशी खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांकडून बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खोट्या माहितीने प्रशासनाचा अपव्यय होतो आणि गंभीर गुन्ह्यांची चौकशी बाधित होऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती देण्यापूर्वी ती खरी आणि खात्रीशीर आहे याची पूर्ण शहानिशा करावी.तत्पूर्वी, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली. तर आरोपींच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे