शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पंतप्रधानांना पत्र लिहीलेली वैशाली म्हणते थॅंक्यू माेदीजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 8:10 PM

दाेन वर्षापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहून ह्रद्यावरील शस्त्रक्रियेसाठी मदत मागणाऱ्या वैशालीचा दहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तिने माेदींचे आभार मानले.

पुणे : खरं सांगु मला खुप आनंद होतो आहे. माझ्या वाढदिवसाला इतके सगळे जण आले आहेत त्यामुळे खुप भारी वाटत आहे. कुणी मला द्यायला गिफ्ट आणले आहे तर कुणी खाऊ आणला आहे. या आनंदात मी सर्वांना ’’बदन पे सितारे लपटे हुए’’ हे गाणे गाऊन दाखवले. तर अंबाबाई कृपा कर या गाण्यावर डान्स करुन दाखवला. सगळे माझे कौतुक करीत होते. मला शुभेच्छा देत माझे अभिनंदन केले.  तो दिवस खुप मजेचा होता.  वैशालीच्या चेह-यावर वाढदिवसाचा आनंद ओसंडून वाहत होता. 

वैशालीचा दहावा वाढदिवस नुकताच सोफोश येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील हडपसर येथे राहणा-या वैशाली यादव हिच्या हदयाला छिद्र असल्याचे कळताच यादव कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आर्थिक संकट समोर उभे राहिले. पुरेशा मदतीअभावी तिच्या हदयावरील शस्त्रक्रिया करता येणार नाही. हे तिच्या काका प्रताप यादव यांना माहिती होते. काय करावे, कुणाकडे मदत मागावी यावर बराच विचार करुन झाला. मात्र काही प्रभावी उपाय सुचेना. यानंतर चिमुकल्या वैशालीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले. त्यात आपल्याला मदत करण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पीएमओ कार्यालयाकडून तिच्या पत्राची दखल घेण्यात आली. आणि रुबी हॉस्पिटलमध्ये तिच्या हदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे सावरत ब-या झालेल्या वैशालीने बुधवारी आपला वाढदिवस सोफोश संस्थेत साजरा केला. संगीतकार व अभिनेते संदीप पाटील, सोफोशच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद, वैशालीचे वडिल, आजी, काका याबरोबरच सोफोशमधील कर्मचारीवृंद वाढदिवस साजरा करण्याकरिता उपस्थित होता. याप्रसंगी सभागृहाची आकर्षक सजावट करुन,रंगीबेरंगी फुगे चिटकवत, लहान मुलांच्या विशेष उपस्थितीत वैशालीच्या जन्मदिवसाचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला. 

पंतप्रधान कार्यालयातून अधिकारी श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधानांच्यावतीने वैशालीला  तब्येतीची काळजी घेण्याचा, भरपूर अभ्यास करुन खुप मोठी हो. अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. वैशालीने पंतप्रधानांना थॅंक्यू म्हणून त्यांचे आभार मानले. सोफोशमधील वातावरण तिला मनापासून आवडते. वाढदिवशी तिने सादर केलेला डान्स पाहून पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी होणा-या सांगत्ये ऐका या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याचे वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले.  दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांना केलेल्या मदतीच्या अर्जामुळे त्यांनी वैशालीला मदत करण्यासंदरर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. या उपचारांनंतर वैशालीने तिचा दहावा वाढदिवस अनाथ मुलांच्या सोफोश संस्थेत साजरा करण्यात आला. 

आता कुठेही दुखत नाही...तब्येतीत सुधारणा होत आहे. शाळा व्यवस्थित सुरु आहे. यापूर्वी छातीचे दुखणे चालु असायचे. आता मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यात खुप फरक पडला आहे. पहिल्यासारखी चक्कर येत नाही. मी व्यवस्थित अभ्यास करु शकते, माझ्या आवडीची गाणी म्हणू शकते, डान्स करते. दुखण्याचा विसर पडला असून आता कुठेही दुखत नसल्याची भावना वैशाली आनंदाने व्यक्त करते.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानsasoon hospitalससून हॉस्पिटलHealthआरोग्य