शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 21:43 IST

गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका: अजित पवार

पुणे : राज्यात सध्या तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नसला तरी पालक आणि संस्था चालक यासाठी आग्रही आहेत. यामुळेच भविष्यात शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खाजगी व सरकारी शाळेतील शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान जगभरात दररोज पाच-सहा लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहे. ही तिस-या लाटेची घंटा असू शकते, त्यामुळे नागरिकांना गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका, असा इशारा देखील पवार यांनी दिला. 

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.27 ) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण,  आमदार चेतन तुपे, संजय जगताप, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पवार यांनी सांगितले, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवून देखील रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. ही बाब चांगली असली तरी नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या सणानिमित्त गर्दी करू नये . सणासुदी निमित्त संसर्ग वाढू नये यांची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे विभागातील गणेशोत्सवा निमित्त काय उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पोलिस यंत्रणेसोबत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे पवार यांनी सांगितले. -------सीएसआरमधून पुणे जिल्ह्याला दीड लाख डोस गेल्या दीड- दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या 31 ऑगस्टला बजाज कंपनीकडून पुणे जिल्हयासाठी तब्बल 1 लाख 35 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन सीएसआर मधून लसीकरण सुरू केले आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल असे पवार यांनी स्पष्ट केले. ------एस.टी कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलू नये पगार होत नसल्याने एका एस.टी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याबाबत पवार यांनी सांगितले कोरोनामुळे एस.टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी राज्य शासनाकडून सर्व मदत करण्यात येत आहे. शासनाने कर्मचा-यांचे पगार करण्यासाठी 500 कोटी रुपये दिले आहेत. लवकरच आणखी निधी देण्यात येईल.  पगार उशीरा होतील, पण नक्की होतील यामुळेच कोणी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवारTeacherशिक्षक