पिंपरीमध्ये लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST2021-04-04T04:10:26+5:302021-04-04T04:10:26+5:30

नीरा नृसिंहपूर: पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. इंदापूर पंचायत समितीचे ...

Vaccination begins in Pimpri | पिंपरीमध्ये लसीकरणास सुरुवात

पिंपरीमध्ये लसीकरणास सुरुवात

नीरा नृसिंहपूर: पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय परीट उपस्थित राहून लस दिलेल्या ग्रामस्थांची विचारपूस करून प्रत्येक ग्रामस्थांना लस घ्या असा सल्ला दिला .

या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती गट विकास अधिकारी विजय परीट यांचा शाल व श्रीफळ देऊन श्रीकांत बोडके यांच्या हस्ते सन्मान केला तर पिंपरी बुद्रुक गावच्या सरपंच ज्योती बोडके यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉक्टर सुमित्रा कोकाटे यांचा सत्कार केला. विस्तार अधिकारी इनुस शेख यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन या वेळी सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी १३७ ग्रामस्थांना लस देण्यात आली व शनिवारी १२५ ग्रामस्थांना लस देऊन उर्वरित राहिलेल्या नागरिकांना लस देण्यास चालूच आहे . दोन दिवसांत २६२ हून अधिक ग्रामस्थांना लस देण्यात आली.

Web Title: Vaccination begins in Pimpri