घोटवडेत ११७५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:43+5:302021-09-02T04:25:43+5:30
ऑगस्टमध्ये १४ तारखेला २००, १७ तारखेला ९०, २४ तारखेला २१५, ३० तारखेला २१८ तर ३१ तारखेला ५५२ नागरिकांचे ...

घोटवडेत ११७५ नागरिकांचे लसीकरण
ऑगस्टमध्ये १४ तारखेला २००, १७ तारखेला ९०, २४ तारखेला २१५, ३० तारखेला २१८ तर ३१ तारखेला ५५२ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामध्ये पहिला डोस व दुसरा डोस असे मिळून १ हजार १७५ नागरिकांचे लसीकरण झाले. उरलेल्या नागरिकांना लस मिळावी अशी मागणी ग्रामस्थाकंडून होत आहे.
लस उपलब्ध करण्यासाठी मुळशी पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी अजित करंजकर यांचे सहकार्य लाभले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घोटवडेच्या डॉ. दीपाली कांबळे, सहायक विजय पावरा, सेविका बेबी वैरागकर, समुदाय आरोग्य अधिकारी श्रवण राऊत, प्रतीक्षा घोगरे, विवेक आंबेकर, डॉ. स्नेहल नंदनवार, डॉ. प्रियंका बारवकर, स्मिता वैरागडे, अनिता मोरे, प्रतीक भोसले, दीप्ती गावनकर यांनी लसीकरणा नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले
यावेळी सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भिमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे, राजाराम शेळके, संतोष गोडाबे, हनुमंत घोगरे, संभाजी गोडाबे, सारिका खाणेकर, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार, मंगल गोडाबे, निकिता घोगरे, सोनाली मातेरे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी सहकार्य केले.
फोटो क्रमांक : ०१ घोटवडे लसीकरण
फोटो ओळी : लसीकरण मोहिमेवेळी उपस्थित शिवाजी देवकर, अजित भेगडे, मयूर घोगरे, कैलास देवकर, राजू शिंदे आदी