शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वाबळेवाडी देशातील पहिली झीरो-एनर्जी शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:12 AM

पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौैकिक मिळविला आहे.

शिक्रापूर : पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौैकिक मिळविला आहे. आता ती देशातील पहिला झीरो-एनर्जी शाळा झाली आहे.ग्रामस्थांची साथ, शिक्षकांचे अथक परिश्रम व त्याला समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची जोड मिळाली, की काय कायापालट होऊ शकतो, याचे ही शाळा एक उत्तम उदाहरण आहे. बँक आॅफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधायला सुरू केलेल्या ८ झीरो-एनर्जी क्लासरूम नुकत्याच तयार झाल्या असून, ही परदेशातील एखादी हायटेक शाळा तर नव्हे ना, असे वाटते आहे.या शाळेने ५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्याला चकित केले होते. स्थानिक ग्रामस्थांची एकसारखी प्रेरणा हेच ते काय बळ असलेल्या या शाळेला राज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून या शाळेत ‘पिसा’ अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. तो येत्या जूनपासून सुरू होतोय. शाळेच्या दर्जात्मक कामाची दखल घेऊन मागील मार्चमध्ये अमेरिकेची ट्रेझरी-बँक बँक आॅफ न्यूयॉर्कने आठ वर्गखोल्या उभ्या करून देण्यासाठी अर्थसाह्य केले ते आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून.या बांधकामात नवीन प्रकारच्या पूर्णत: काचेच्या २२ फूट रुंद, २२ फूट लांब तसेच १४ फूट उंचीच्या ८ वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक आहेत. पॉलिकार्बोनेट व टेनसाईल मेंब्रेन यांचे द्विस्तरीय छत, टफन ग्लासच्या भिंती (१,५०० अंश सेल्सिअस तापमानाला या काचेचे मजबुतीकरण केले जाते) असे या प्रत्येक रूमचे बांधकाम असून चारही बाजूंनी ५ फुटांचे पन्हाळ छत प्रत्येक वर्गाला उभे केले आहेत. छताचा पहिला स्तर टेन्साईल मेंब्रेनचा (निरुपयोगी प्लॅस्टिकपासून बनविलेले मटेरियल) असून त्यामुळे प्रकाश स्वीकारणे व उष्णता परिवर्तित हे दोन्ही साध्य होते. त्याखालील स्तर हा पॉलिकार्बनचा असून पॉलिकार्बनच्या रासायनिक संरचनेमुळे प्रकाशाचे विस्तारीकरण होत असल्याने थंड, उल्हसित व उबदार प्रकाश प्रत्येक वर्गखोलीला मिळत आहे. त्यामुळे झाडाखाली मिळणाºया सावलीसह खेळती हवा दोन्ही खोल्यांमध्ये मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व उपशिक्षक एकनाथ खैरे यांनी दिली. याच आठही वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असून, तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आल्याची माहिती वारे यांनी दिली.