सरपंच परिषदेच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी उत्तम टाव्हरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST2021-02-07T04:10:48+5:302021-02-07T04:10:48+5:30
पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या ...

सरपंच परिषदेच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी उत्तम टाव्हरे
पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आज जिल्ह्यातील काही पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आंबेगाव सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी टाव्हरे यांची सरपंच परिषदेच्या वतीने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष शशिकांत मोरे, कार्याध्यक्ष अर्चना शहा, राज्य पदाधिकारी श्रीक्षेत्र तुळापूरचे आदर्श सरपंच गणेश पुजारी, खरपुडीचे सरपंच उमेश गाडे, बबनराव टाव्हरे, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब टाव्हरे, अमोल थोरात, अवसरी बुद्रुकचे सरपंच पवन हिले, निरगुडसरच्या सरपंच उर्मिला वळसे, लाखनगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे, नागापूरच्या सरपंच सुजाता रिठे उपस्थित होते. या निवडीबद्दल टाव्हरेवाडी,अवसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने उत्तम टाव्हरे यांचे अभिनंदन केले आहे.
०६ मंचर