शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला धमकाविण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा वापर; दीप्ती काळेच्या साथीदाराला पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:56 IST

बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याला व्यवसायासाठी ३५ लाख रुपये या टोळीने दिले होते.

पुणे : व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची जमीन नावावर करुन घेतल्यानंतर आणखी ५८ गुंठे जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे. हाताने मारहाण करणे आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकाविल्याच्या प्रकरणात अ‍ॅड. दीप्ती काळेच्या साथीदाराला फरासखाना पोलिसांनीअटक केली.

न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. नितीन मनोहर हनमे (वय ३१, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीप्ती काळे, निलेश शेलार आणि आणखी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी अ‍ॅड. दीप्ती काळे हिचे मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरील खिडकीतून पळून जाताना खाली पडून मृत्यु झाला. 

बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याला व्यवसायासाठी ३५ लाख रुपये या टोळीने दिले होते. त्याबदल्यात मरकळ येथील ४२ गुंठे जमीन दीप्ती काळे हिच्या नावावर करुन घेतली होती. उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली जात होती. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी नितीन हनमे याला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घ्यायचा आहे. या गुन्ह्यात आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी हनमे याला किती रक्कम मिळाली आह. या जमीन व्यवहार कशाप्रकारे झाला, याचा तपास करण्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी अ‍ॅड. बेंडभर यांनी मागणी केली. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक