शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो करणार शहरातील प्रवासी वाहनांचा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:43 IST

प्रवाशांनी त्यांचे खासगी वाहन रस्त्यावर आणू नये यासाठी म्हणून ही सुविधा

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : फर्स्ट माईल टू लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमोठ्या संख्येने वाहनाची मालकी आहे त्यांनी प्रतिसाद देणे महामेट्रोला अपेक्षित

राजू इनामदार -  पुणे : शहरातील रिक्षा तसेच अन्य प्रवासी वाहनांचा महामेट्रो त्यांच्या स्थानकांकडे प्रवासी ने- आणण्यासाठी उपयोग करून घेणार आहे. अशा वाहनांना ई-रिक्षा, ई-बस, ई-टॅक्सी असे नाव देण्यात येणार आहे. त्यांनी मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या नजीकच्या मेट्रो स्थानकापर्यंत आणून पोहोचावयचे आहे किंवा स्थानकांमधून उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत घेऊन जायचे आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनीने निविदा जाहीर केली आहे.जगातील ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे तिथे अशा प्रकारची सुविधा दिली जाते. त्याला फर्स्ट माईल टू लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असे म्हणतात. प्रवाशांनी त्यांचे खासगी वाहन रस्त्यावर आणू नये यासाठी म्हणून ही सुविधा दिली जाते.  मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते दापोडी या प्राधान्य मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्या मार्गावरच्या प्रवाशांना त्यांच्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत येण्या-जाण्यासाठी म्हणून महामेट्रोने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. ही निविदा त्याचाच एक भाग आहे. स्थानक घरापासून लांब असेल तर तिथपर्यंत वाहनाने जायचे, तिथे वाहन पार्क करायचे व नंतर मेट्रोने प्रवास करायचा असे होते. त्यासाठी प्रवाशांना मोठा वाहनतळ उपलब्ध करून द्यावालागतो. तसे होऊ नये यासाठी हा ई-बस, ई-रिक्षाचा पर्याय शोधण्यात आला आहे.यात महामेट्रोनेच प्राधान्य मार्गाकडे येणाºया काही रस्त्यांची निवड केली आहे. निवासी परिसर त्यासाठी प्राधान्यानघेतले आहेत. मेट्रोच्या स्थानकापासून पुढचा काही किलोमीटरपर्यंतचा परिसर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. ई रिक्षा किंवा ई बसचालकांनी या परिसरातून मेट्रोच्या स्थानकापर्यंत प्रवासी घेऊनयेणे व स्थानकातून उतरणाºया प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाणे यात अपेक्षित आहे. वाहन सहज उपलब्ध व्हावे, त्यासाठी अ‍ॅप वगैरे सुविधा असावी, त्यावरून वाहन बोलवता यावे,असेमहामेट्रोला अपेक्षित आहे..........

सामंजस्य करार करणार : मेट्रो कार्ड असणारहे काम करू इच्छिणाऱ्यांकडून महामेट्रोने प्रस्ताव मागवले आहेत. वाहनांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी किंवा ज्यांच्याकडे मोठ्या संख्येने वाहनाची मालकी आहे त्यांनी प्रतिसाद देणे महामेट्रोला अपेक्षित आहे. निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल. त्यात मेट्रोपर्यंत प्रवासी आणण्यासाठी म्हणून महामेट्रोने त्यांना काय सुविधा द्यायच्या, त्यांनी प्रवाशांकडून किती पैसे घ्यायचे, त्यासाठी मेट्रो कार्ड काढायचे अशा गोष्टी ठरवण्यात येणार आहेत........

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर