शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळ विक्रेत्याचा वापर; नाझीरकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:42 IST

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपी हा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

पुणे : उच्च पदस्थ असताना व कायद्याचे सर्व ज्ञान असताना नोकरीच्या काळात जमा केलेला काळा पैसा व्हाईट करण्यासाठी फळविक्रेत्याचा वापर हनुमंत नाझीरकर याने केल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले. बारामती न्यायालयाने अधिक तपासासाठी नाझीरकर याची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात फसवणूक केलेल्या व उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याला ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी महाबळेश्वर येथून अटक केली होती. त्याला बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. बारामती पोलिसांनी त्याला अटक करुन आज न्यायालयात हजर केले. 

याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपी हा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे. उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आपल्या पदाचा दुरोपयोग करुन नाझीरकर याने काळा पैसा कमविला आहे. हा काळा पैसा व्हाईट करण्यासाठी त्याने अज्ञान फळ विक्रेत्याचा आधार घेतला. त्याच्या बँक खात्यात पैसे टाकून ते फळ विक्रीचे असल्याचे भासवून नंतर ते पैसे आपल्या खात्यात वळते केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीला आपला २०११ पासून २०२० पर्यंत उपयोग करुन घेतला जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची आवश्यक असल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक