शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

उरुळीची वाहतूककोंडी फुटणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:02 AM

नित्याचीच समस्या : पोलीस यंत्रणा कामाला

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात होणारी वाहतूककोंडी नित्याचीच आहे. या परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बेशिस्तपणाचे दर्शन घडवत असते. या वाहतूककोंडीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे; पण यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नव्हते. ‘ही उरुळी कांचन परिसराची शोकांतिका’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारच्या (दि.२८) अंकात प्रसिद्ध झाली.

या बातमीची तत्काळ दखल घेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूककोंडीमुक्त पुणे-सोलापूर रस्ता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून आपल्या अखत्यारीत स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग सुरु केला आहे. या विभागासाठी एक पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करून त्यांच्याबरोबर प्रत्येक पोलीस चौकीचा एक पोलीस कर्मचारी मदतीला देण्याचा निर्णय घेतला तसेच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, देवाची उरुळी, वडकी आदी ग्रामपंचायतींना एक एक वाहतूक वॉर्डन देण्याची विनंती केली. ती मागणी बहुतेक सर्व ग्रामपंचायतींनी मान्य केल्याने हे काम आणखी सुकर होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. ते म्हणाले, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाºयांनी फक्त वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यायची अशा सूचना देत अवैध व अस्ताव्यस्त पार्किंग करणारी वाहने आणि वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.तसेच सातत्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मौलिक सूचना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश असलेली तसेच काही अधिकारी व एक सल्लागार समिती नियुक्त केली. त्यांच्या सूचनांच्या आधारित वाहतूक नियंत्रण करण्याच्या कामातसुधारणा करण्यात येतील असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी