शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

UPSC Success Story: घरात भांडून 'ती'ने लग्नाचे स्थळ नाकारले, परीक्षाकाळात आईचे निधन; अखेर शामल IAS झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:15 IST

पुणे जिल्ह्यातील शामल भगतने २०२३ च्या युपीएससीच्या निकालात (UPSC result 2023) २५८ वी रँक मिळवत यश मिळवले आहे.....

पुणे : मी युपीएससीची परीक्षा पास होणारच! मी आयएएस होणारच! असं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती झटली. ती लढली आणी ती जिंकली. आर्थिक परिस्थिती बेताची, दहावीनंतर लगेच लग्नासाठी आलेले स्थळ यावर मात करत ती आयएएस (IAS) झाली. हा प्रेरणादायी प्रवास आहे शामल भगत (Shamal Bhagat IAS) हिचा. पुणे जिल्ह्यातील शामल भगतने २०२३ च्या युपीएससीच्या निकालात (UPSC result 2023) २५८ वी रँक मिळवत यश मिळवले आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भगतवाडी गावातील शामलने युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. लहानपणापासून घरी गरिबी असल्याने शामलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गावतल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शामल कल्याण भगत हिने युपीएससी परीक्षेत २५८ वी रँक मिळवत थेट आयएएस पदाला गवसणी घातली.

दुसऱ्या प्रयत्नात यश -

शामल ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीच्या परीक्षेतही तिने पहिला क्रमांक मिळवत यश प्राप्त केले होते. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे केले. बारावीतही तिने अभ्यास करून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी पूर्ण केली. येथे शिकताना तिने विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावले होते. याअगोदर दहावी झाल्यानंतर शामलला लगेचच तिच्या घरच्यांनी लग्नासाठी स्थळ आणलं होतं. पण त्याला विरोध करत शामलने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि आता IAS होऊन तो निर्णय कसा योग्य होता हे सर्वांना दाखवून दिले.  UPSC च्या पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आलं नाही. दुसऱ्यावेळी प्रचंड जिद्दीने अभ्यास करत तिने मेहनत घेतली. पहिल्या वेळी झालेल्या चुका दुसऱ्या वेळी होऊ दिल्या नाहीत. त्यानंतर तिने दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली.

परीक्षाकाळात आईचे निधन-

मुलाखतीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या आईचं कर्करोगामुळं निधन झालं. आईच्या निधनामुळं तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. अशा खडतर परिस्थितीतही ती डगमगली नाही. स्वत:ला सावरत मुलाखतीसाठी तिनं एकटीनं दिल्ली गाठली आणि १० जानेवारीला मुलाखतीचा अवघड टप्पाही पार केला. अखेर प्रतिष्ठेची समजली जाणारी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होत तिनं आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिली.

अखेर २०२३ चा यूपीएससीचा निकाल लागला आणि शामल देशात २५८ वी रँक मिळवत पास झाली. तिने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात पोहोचवलं. शामलच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा, भावंडांचा मोठा हातभार आहे, असं तिने सांगितले. कोणताही क्लास न लावता तिने यूपीएससीची तयारी केली होती. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगIndapurइंदापूरPuneपुणे