बारामतीत विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:13 IST2021-08-25T04:13:52+5:302021-08-25T04:13:52+5:30

बारामती : शहरात मास्क न घालणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शिथिल केलेल्या निर्बंधांनंतर शहरात ...

Unmasked in Baramati | बारामतीत विनामास्क

बारामतीत विनामास्क

बारामती : शहरात मास्क न घालणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शिथिल केलेल्या निर्बंधांनंतर शहरात गर्दी वाढताना दिसून येत आहे.

प्रशासन वारंवार कोरोनाचे निर्बंध पाळा असे सांगून देखील काही माथेफिरू विनाकारण मास्क न घालता रस्त्यावर फिरत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. या उदासीन नागरिकांवर बारामती शहर पोलीस उपाधीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वत: रस्त्यावर फिरून दांडात्मक कारवाई केली आहे.

बारामती शहर दुसऱ्या लाटेमध्ये होरपळून निघालेले आहे. स्थानिक नागरिकांना उपचारासाठी दमछाक झाली. अनेकांना वेळेवर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नाहीत. हे चित्र नागरिकांनी डोळ्यांनी पाहिले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तिसरी लाट येण्याअगोदर पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे.

बारामती शहर पोलिसांनी विनामास्क नागरिकांवर दांडात्मक कारवाई केली.

२४०८२०२१-बारामती-१२

२४०८२०२१-बारामती-१३

Web Title: Unmasked in Baramati