वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; लोणी काळभोरमधील अपघात, वाहनचालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:50 IST2017-12-23T13:48:21+5:302017-12-23T13:50:47+5:30
सिद्राममळा परिसरात तीर्थक्षेत्र रामदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कामावरून घरी परतणाऱ्या एका सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; लोणी काळभोरमधील अपघात, वाहनचालक फरार
लोणी काळभोर : येथील सिद्राममळा परिसरात तीर्थक्षेत्र रामदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कामावरून घरी परतणाऱ्या एका सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत सिद्राममळा येथे तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात कामावरून घरी परतणारे भगवान हरिभाऊ खंडागळे (वय ४२, रा. कोळपे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) हे मरण पावले. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. धडक देऊन संबंधित वाहनचालक पळून गेला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.