अज्ञातांनी केली सेल्फी पॉइंट येथे तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST2020-12-25T04:10:43+5:302020-12-25T04:10:43+5:30

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली आहे. याबाबत सागर सत्यवान ...

Unknown vandalism at Kelly Selfie Point | अज्ञातांनी केली सेल्फी पॉइंट येथे तोडफोड

अज्ञातांनी केली सेल्फी पॉइंट येथे तोडफोड

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली आहे. याबाबत सागर सत्यवान भूमकर (वय २९, रा. नऱ्हे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकसित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी ‘आय लव्ह नऱ्हे’ अशाए प्रकारचा विद्युत रोषणाई केलेला फलक आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चार तरुणांपैकी एकाने ह्या फलकाची तोडफोड केली असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

---------

तोडफोड राजकीय वैमनस्यातून?

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समविष्ट करण्याचा अध्यादेश बुधवारी राज्य सरकारने काढला. त्यात नऱ्हे गावाचाही समावेश आहे. राजकीय वर्चस्व तसेच वैमनस्यातून ही तोडफोड झाली असावी, अशी चर्चा नऱ्हे परिसरात होती.

Web Title: Unknown vandalism at Kelly Selfie Point