ओतूर (जि. पुणे) : बसस्थानकाशेजारच्या किराणा मालाच्या दुकानाजवळ एका अज्ञात व्यक्तीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाला. ही व्यक्ती पुणे येथे उपचार घेत असताना मरण पावली आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा हल्ला झाला होता. ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनीच या व्यक्तीस रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुढे पाठविले आहे. तरीदेखील गुन्हा का नोंदविला नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर घटनेची नोंद होणार आहे, असे ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}