अध्यासनांवर विद्यापीठाची नजर

By Admin | Updated: May 7, 2014 04:19 IST2014-05-06T22:40:43+5:302014-05-07T04:19:52+5:30

पुणे विद्यापीठातील अध्यासनांसाठी नियमावली घालून देण्यात येणार असून दरवर्षी त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

University's look at the students | अध्यासनांवर विद्यापीठाची नजर

अध्यासनांवर विद्यापीठाची नजर

पुणे : पुणे विद्यापीठातील अध्यासने नेमकी काय करतात, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून अनेकदा उपस्थित केला जातो. त्यामुळेच यापुढे अध्यासनांसाठी नियमावली घालून देण्यात येणार असून, दरवर्षी त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अध्यासनांनी वर्षाला अहवाल सादर करण्याची सक्ती करण्यात येणार असून त्यावरील देखरेखीसाठी समिती नेमण्याचा निर्णय विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला.
पुणे विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित भीमसेन जोशी, शंतनुराव किर्लोस्कर यांच्यासह वीस महापुरूष आणि थोर व्यक्तीमत्वांच्या नावाने अध्यासने आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही अध्यासने स्थापन करण्यात आली. विद्यापीठ आणि समाज यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून अध्यासनांना महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, याठिकाणी नेमके कोणते संशोधन होते, याविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली. अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार अध्यासनांचे कामकाज चालविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात, प्रा. अरूण अडसूळ यांनी आज व्यवस्थापन परिषदेत अध्यासनांच्या कामांचा आढावा घेणारा अहवाल सादर केला. त्यावर चर्चा झाल्यानंतर नियमावली तयार करण्याचा निर्णय घेणत आला. त्यानुसार, अध्यासनांनी नियमावलीनुसार काम करावे, दरवर्षी विद्यापीठाला अहवाल सादर करावा, अध्यासनांमधील संशोधन प्रकाशित करावे अशा सूचना देण्यात आल्या. यापूर्वी अध्यासनांना कोणतीही नियमावली नव्हती. मात्र, या नियमावलीमुळे अध्यासनांच्या कामामध्ये सुसूत्रता देणार असून तसा अहवाल विद्यापीठापुढे द्यावा लागणार आहे.

 

 

Web Title: University's look at the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.