शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

विद्यापीठ देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 07:00 IST

आपत्ती व्यवस्थापन हा विषय मर्यादित विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कक्ष विद्यापीठातील अध्यासनाप्रमाणे काम करणार

- राहुल शिंदे -- लोकमत न्यूज नेटवर्क- पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने गेल्या दोन तपापासून  विद्यार्थ्यांकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी जमा केलेली ९ कोटी रुपये रक्कम खरंच केली नसल्याची धक्का दायक माहिती समोर आली आहे. मात्र, उशिरा का होईना विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून सर्व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे १९९५ पासून विद्यापीठाच्या तिजोरीत पडून असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम अखेर चांगल्या कामासाठी कारणी लागणार आहेत.राज्याच्या तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकी १० रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून १० रुपये रक्कम जमा करण्यास सुरूवात केली.त्यामुळे राज्यातील प्रत्येक विद्यापीठाकडे कोट्यवधी रूपये जमा झाले आहेत.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे ९ कोटी रुपये पडून आहेत.मात्र,‘आव्हान’ सारख्या शिबिरांचे आयोजन करून १२०० विद्यार्थ्यांना कमी-अधिक प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण देण्यापलिकडे पुणे विद्यापीठाने काहीही केले नाही. परंतु, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या सूचनेनुसार विद्यापीठात आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.चाकणे म्हणाले, विद्यापीठाच्या आव्हान शिबिरातून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी सध्या मुंबई,सांगली आदी भागात मदतकार्य करत आहेत. मात्र,आपत्ती व्यवस्थापन हा विषय मर्यादित विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपतकालीन परिस्थितीत अफवा पसरल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना आपत्ती पूर्वीचे प्रशिक्षण,आपत्ती काळात काय करू नये याचे प्रशिक्षण,आपत्ती आल्यानंतर काय करावे आणि आपत्तीनंतर पुनर्वसन काळातील प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठीच विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार असून हा कक्ष विद्यापीठातील अध्यासनाप्रमाणे काम करणार आहे. विद्यापीठाकडे जमा असलेल्या नऊ कोटी रुपयांमधून मिळणा-या व्याजाच्या रक्कमेवर व्यवस्थापन कक्षाचे कामकाज सुरू ठेवले जाईल. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ)च्या सहकार्याने विद्यापीठाशी संलग्न सर्व प्राध्यापकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्राध्यापकांना प्रशिक्षण दिल्यानंतर हे प्राध्यापक ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. त्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतील.तसेच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम अनिवार्य करण्याबाबत विद्यापीठाकडून विचार केला जात आहे,असेही चाकणे यांनी सांगितले.------------

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी