शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

विद्यापीठाने एखादे क्षेत्र निश्चित करून संशोधन करावे : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 21:11 IST

ज्या उद्योगांची कामगिरी चांगली आहे, त्यांच्यामध्ये सरकार भाग घेईल, तसेच त्यांना शेअरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल..

ठळक मुद्देविद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसतर्फे वेबिनार आयोजितकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधनकार्य चांगले असून विद्यापीठाने एखादे क्षेत्र निश्चित करून त्यातील संशोधन आणि नवसंशोधनासंबंधी प्रस्ताव सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाला द्यावा, त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे आर्थिक मदत करील, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी शनिवारी यांनी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसतर्फे आयोजित वेबिनारमध्ये शनिवारी नितीन गडकरी यांनी विद्यापीठाच्या स्टार्ट-अप्सशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. 'स्टार्ट -अप्स अँड स्मॉल एंटरप्राईजेस - फ्यूच्युरिस्टिक ईकोसिस्टीम पोस्ट पॅनडेमिक' या विषयावर इनक्यूबेशन सेंटरद्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. 

नितीन गडकरी म्हणाले, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई एक्सचेंजची स्थापना करीत आहे. ज्या उद्योगांची कामगिरी चांगली आहे, त्यांच्याकडून सरकार भाग घेईल, तसेच त्यांना शेअरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे उद्योजकांना उद्योगाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मदत होईल. तसेच स्टार्टअप्सनी देशास आवश्यक असलेले उपक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे.त्यांनी अशा विशिष्ट स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर उपयुक्त गोष्टी तयार होतील, शिवाय त्यामुळे लोकांचे कामासाठी होणारे स्थलांतर कमी होईल. 

गडकरी म्हणाले, ग्रामीण आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी छोट्या व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे आणि शहरांच्या ठिकाणी तेथील गरजा लक्षात घेऊन त्यानुसार तेथील नियोजन करायला हवे. .....कोरोना महामारीच्या काळात विद्यापीठातर्फे कोव्हिड-१९ चे निदान करणाऱ्या प्रयोगशाळेच्या निर्मितीवर काम केले जात आहे. तसेच विद्यापीठाच्या स्टार्ट -अप द्वारे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले असून त्याला आवश्यक ती मान्यता सुद्धा मिळाली आहे.- डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ---------- छोट्या उद्योगधंद्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्या उद्योगांचे व्यावसायिकरण करता येईल अशा प्रकल्पांचे संशोधन विद्यापीठाकडून केले जाईल.- डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ........

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीPune universityपुणे विद्यापीठbusinessव्यवसायStudentविद्यार्थीnitin karmalkarनितीन करमळकर