विद्यापीठातर्फे काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:13 IST2021-03-26T04:13:46+5:302021-03-26T04:13:46+5:30

कोरूनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

The university has announced the schedule of some examinations | विद्यापीठातर्फे काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यापीठातर्फे काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोरूनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच २५ एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ११ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शारीरिक शिक्षण पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ११ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत, विधी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते १७ एप्रिल दरम्यान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते २० एप्रिल आणि जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा १० ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक टप्प्या-टप्प्याने जाहीर केले जाणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------

Web Title: The university has announced the schedule of some examinations