शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

या ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजने वेधले डमरू फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:55 PM

‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे. ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

ठळक मुद्दे महोत्सावातील ‘चॅम्पियनशिप’साठी देशभरातून ५ वादकांची करण्यात आली निवडड्रमिंगमधील व्यावसायिक शिक्षण घेण्याची तिची इच्छा

पुणे : ड्रमचे पाच पीस वाजवाताना लागणारी ताकद, वादनातील लय, सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाफ... पायाने बेस ड्रम आणि हाय हॅट वाजवतानाच हातांनी साधावा लागणारा समन्वय... वादनासाठी आवश्यक असणारा रियाझ आणि संगीताची साधना अशा वैविध्यपूर्ण अंगांनी विकसित केलेल्या ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे.अभिनव इंग्रजी माध्यमात शिकणारी अनन्या पाटील अभ्यासातील हुशारी जपत, टेनिस खेळण्याची आवड जपत ड्रमवादनाचे धडे गिरवत आहे. कलेच्याक्षेत्रातील मुलांची अभिरुची कमी होत चालली आहे, अशी कायम होणारी ओरड तिने आपल्या वादनातून खोटी ठरवली आहे. लंडनमधील ट्रिनिटी स्कूल आॅफ म्युझिकच्या सहा परीक्षा देऊन अनन्याने आपल्या कौशल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अनन्याची आई वैजयंती पाटील म्हणाल्या, ‘‘१५ वर्षीय अनन्याला लहानपणापासून वाद्यांचे आकर्षण होते. गणेशोत्सव ढोलताशा वादनात सहभागी होण्याची तिची अनावर इच्छा होती. तिने वयाच्या नवव्या वर्षीच ढोलताशा पथकात सहभागी होण्याचा हट्ट धरला. मात्र, वादनापूर्वी एक महिना आधीपासून करावा लागणारा सराव, दहा दिवसांचे वादन, त्यामुळे शाळेला सुटी घ्यावी लागत असल्याने आम्ही तिला पथकात सहभागी होण्यास नकार दिला. अनन्याचा हट्ट कायम होता. तिचे मन वळवण्याच्या दृष्टीने ‘तू ढोलताशा पथकात सहभागी होण्याऐवजी छंद म्हणून एखादे वाद्य शिक,’ असा पर्याय आम्ही तिला सुचवला.’’आई-वडिलांचे म्हणणे मान्य करून अन्यनाने ड्रम शिकण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी तो हट्ट मान्य करून तिला ड्रमच्या क्लासला घातले. काही दिवस क्लासला गेल्यानंतर ती कंटाळा करेल किंवा थकून जाईल आणि दुसरे वाद्य शिकण्याचा हट्ट धरेल, असे आई-वडिलांना वाटले; मात्र अनन्याची जिद्द कायम होती. ड्रम शिकायला लागली तेव्हा अनन्या १० वर्षांची होती. त्या वेळी पुण्यात नुकतेच फर्टाडोज स्कूल आॅफ म्युझिक सुरू झाले होते. अनन्याने मन लावून वादनाचे सर्व शिक्षण घ्यायला सुरुवात केली. ‘ट्रिनिटी स्कूल आॅफ म्युझिक आॅफ लंडन’च्या ग्रेड परीक्षा द्यायला सुरुवात केली. या स्कूलच्या एकूण आठ ग्रेडपैकी सहा ग्रेडच्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे.’’ डमरू फेस्टिव्हलसाठी अनन्याने ड्रम वादनाची छोटीशी क्लिप पाठवली होती. या महोत्सावातील ‘चॅम्पियनशिप’साठी देशभरातून ५ वादकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेली ती एकमेव मुलगी ठरली आहे. 

ड्रम वाजवताना हात, पाय आणि मेंदू यांच्यातील लयबद्धता साधावी लागते. पायाने बेस ड्रम, हाय हॅट वाजवावे लागतात, तर दोन हातांनी ड्रमचे पाच पीस वाजवावे लागतात. यासाठी खूप ताकद लावण्याची गरज असते. यासाठी अनन्या दररोज दोन तास सराव करते. तिने रशियन कॉन्सोलेटमध्येही वादन केले आहे. मोठेपणी ड्रमिंगमधील व्यावसायिक शिक्षण घेण्याची तिची इच्छा असल्याचा मानस वडील अभिजित पाटील यांनी बोलून दाखवला.

टॅग्स :Puneपुणे