ठाण्यात को.म.सा.प. चा ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमातून वाचकांची अभिरुची वाढविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:59 PM2017-12-09T15:59:36+5:302017-12-09T20:13:23+5:30

ठाणेकरांसाठी विविध कार्यक्रम राबविणाऱ्या कोमसाप ठाणे शाखेच्या वतीने वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

K.M.P. Trying to increase the likelihood of readers by the 'We Can Read' program | ठाण्यात को.म.सा.प. चा ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमातून वाचकांची अभिरुची वाढविण्याचा प्रयत्न

ठाण्यात को.म.सा.प. चा ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमातून वाचकांची अभिरुची वाढविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे‘आम्ही पण वाचतो’ हा अभिनव उपक्रमप्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम कुठल्याही एका साहित्य प्रकारावर आधारीत पुस्तकावर बोलण्याची संधी

ठाणे: वाचन संस्कृती टिकविण्यासाठी आणि वाचकाचे पुस्तकाशी असलेले नाते जाणून घेण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर आयोजित ‘आम्ही पण वाचतो’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
      अशा प्रकारचा उपक्रम कोमसाप पहिल्यांदाच राबवित आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. वाचनाची पिढी कमी होत आहे अशी ओरड केली जाते. परंतू वाचन हे केले जात असले तरी तो टक्का तेवढा वाढलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम हाती घेण्याचे कोमसापने ठरविले आहे. यात वाचक वाचलेल्या पुस्तकांवर आपले अनुभव कथन करणार आहेत, त्यातील एखादे प्रसंग सांगतील असे कोमसाप, ठाणेतर्फे सांगण्यात आले. या उपक्रमात सहभागी होणारे मान्यवर देखील वाचनाचे फायदे सांगणार आहेत, एखादे पुस्तक वाचल्यावर काय फरक पडतो हे उपस्थितांना सांगतील. हा उपक्रम गुरूवार २१ डिसेंबर रोजी सायं. ५ ते ७ यावेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे (प.) येथे राबविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी, ज्येष्ठ व्यगंचित्रकार - लेखक विवेक मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       सर्व वाचनालयातील सभासद, पदाधिकारी, विविध ग्रंथप्रेमी संस्थांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांनी केले आहे. वाचकांना पाच मिनीटाच्या कालावधीत कथा, कादंबरी, चरित्र यापैकी कुठल्याही एका साहित्य प्रकारावर आधारीत पुस्तकावर बोलण्याची संधी दिली जाणार आहे. कार्यक्रम विनाशुल्क आहे.

Web Title: K.M.P. Trying to increase the likelihood of readers by the 'We Can Read' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.