विमाननगर : येरवडा येथील डाॅन बाॅस्को हायस्कूल मागील मोकळ्या मैदानातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अज्ञात युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना शनिवारी(दि.२५ )रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमुळे उघडकीस आली.पोलिसांकडून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना कळवल्यावर पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या सह अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 20:19 IST
क्रिकेट खेळत असताना मुलांना हा मृतदेह दिसला...
येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय
ठळक मुद्देयेरवडा पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेची पथके दाखल