शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२ तासाच्या शोधानंतर मृतदेह सापडला... पुण्यातील दुर्दैवी घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:20 IST

वारजे ते कात्रज...अवघे काही मिनिटांचे अंतर...पुणेकर तर वारज्याच्या पुलावरून अगदी सवयीने रोज कात्रजला ये-जा करतात. पण प्रत्येकाच्या नशिबात असा अनुभव असतोच असे नाही.

ठळक मुद्देकिरण हुले यांचा ओढ्यात पडून मृत्यू, वारज्यातील घटना अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ तास शोध घेऊन बाहेर काढला मृतदेह 

 

पुणे :वारजे ते कात्रज...अवघे काही मिनिटांचे अंतर...पुणेकर तर वारज्याच्या पुलावरून अगदी सवयीने रोज कात्रजला ये-जा करतात. पण प्रत्येकाच्या नशिबात असा अनुभव असतोच असे नाही. पुण्यातील किरण हुले यांचा रविवारी याच वारज्यातील पुलावर अपघात झाला आणि ते थेट नाल्यात पडले. रात्री काही तास शोधकार्य केल्यावर सोमवारी दिवसभर पोलिसांसोबत अग्निशमन दलाने शोध घेऊन तब्बल १२ तासाच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सापडला. 

 

      किरण अभय हुले या ४० वर्षीय व्यक्तीचा कर्वेनगरहून वारजे पुलामार्गे कात्रजला जाताना हा अपघात झाला. त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाचा धक्का लागला असावा. या धक्क्याने हुले गाडीवरून पडून दोन पुलांच्या दरम्यान असलेल्या सांध्यातून थेट खालच्या नाल्यात पडले. रात्री ११ची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. मात्र शेजारून वावरणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना बघितली आणि पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून रामनगर पोलीस चौकी पोलिसांनी धाव घेत शोध घेण्यास सुरुवात केली. अंधार आणि नाल्यातील दलदल बघून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यांनी सुमारे चार तास शोध घेऊन अंधारामुळे शोधकार्य थांबवले. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आणि अखेर संध्याकाळी हुले यांचा मृतदेह हाती लागला. दरम्यान त्यांच्या गाडीच्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी त्यांच्या घरी संपर्क साधला. अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढलेला मृतदेह हुले कुटुंबीयांनी ओळखला असून रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करणे सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू