शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:58 IST

चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून पती- पत्नी दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले.

ठळक मुद्देरस्ता नसल्याने रोज अडचणीचा सामना करत नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु

खेड : रेटवडी येथे चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दुचाकीसह पती- पत्नी पाण्यात पडून पत्नीचा बुडून दुर्दैवी मुत्यू झाला. पतीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला. उज्वला राजेंद्र भगत (वय ३७, सध्या रा. राजगुरुनगर, मुळ गाव निमगाव खंडोबा ता. खेड ) असे मृत्यूमुखी पड़लेल्या महिलेचे नाव  आहे.  याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भगत दांपत्य हे  चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. पती राजेंद्र यांने पत्नी उज्वला हिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यांचा प्रवाह जास्त असल्याने पती- पत्नी पाण्यात वाहून गेली. राजेंद्र भगत यांनी आरओरडा केला.त्यामुळे रेटवडी येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धाऊन आले. नागरिकांच्या मदतीने राजेंद्र भगत यांना वाचविण्यात यश आले. परंतू, पाण्याच्या प्रवाहात त्यांच्या पत्नी वाहत गेल्याने दुर्दैवी अंत झाला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुने दळणवळणासाठी रस्ता आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतात. भगतवस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा अडचणीचा सामना करत येथील नागरिकांचा रोज जीवघेणा प्रवास सुरु असतो. या घटनेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यामुळे भगतवस्ती रेटवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :KhedखेडPuneपुणेDamधरणDeathमृत्यू