शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने चावा घेतल्याने दुसरीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; बालकाच्या निधनाने शिरूरमध्ये सर्वत्र हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 12:57 IST

शिरुर शहरात मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला त्रस्त

शिरुर : शिरूर (जोशीवाडी ) येथील महादेवनगर येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव (वय ८) या विद्यार्थ्याला कुत्राने चावा घेतला व त्यात तो मृत्युमुखी पडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महादेवनगर येथे राहणाऱ्या स्वप्नील यादव यांच्या मुलगा पवन हा रविवारी अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील नायडू दवाखान्यात नेण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचे सोमवारी ३ एप्रिलला निधन झाले. पवन याला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता.व तो शहरातील आरएमडी प्रशालेत इयत्ता दुसरीत शिकत होता. पवन हा शहरातील प्रसिध्द डॉ . कै. आर. डी. यादव यांच्या नातू होता. पवन यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यत शोकाकुल वातावरणात पवन यांचा अंत्यविधी शिरुर येथे झाला.

दरम्यान, मागील काही वर्षापासून शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त आहेत. भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच त्याचे निर्बिजीकरण करणे, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करून ही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. पवन यांच्या मृत्यू कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चिंता व्यक्त करून यावर तातडीने उपाययोजना करा - डॉ. विक्रम घावटे ( बालरोगतज्ञ )

कुत्र्याने अथवा मांजराने चावा घेतला अथवा ओरखल्यावर तातडीने या संदर्भातील रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी. लस घेण्याबाबत चाल ढकलपणा करू नये. सरकारी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध असते, असे डॉ. घावटे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिरुर शहरात वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या वावराबद्दल चिंता व्यक्त करून यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ही केली.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राDeathमृत्यूdoctorडॉक्टरGovernmentसरकार