शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय संस्थेचा अहवाल प्रसिध्द झालेला नसताना बेरोजगारीचे आकडे आले कुठुन ...? व्ही. के. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:48 IST

भाजपा सत्तेवर आल्यापासून काश्मीर प्रश्न चिघळला आहे, असे वारंवार सांगण्यात येते, त्यात तथ्य नाही.

ठळक मुद्देसैन्यदलासाठीच्या शस्त्र खरेदीत निविदा प्रसिद्ध करण्यापर्यंत येण्यासाठीच अनेक चाचण्या

पुणे : सत्ताधारी भाजपासरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होणार होते, त्याचे काय झाले अशी विचारणा केली जाते. मात्र, त्याचा अर्थ नीट समजावून घेतला गेलेला नाही. मागील ५ वर्षात डाळ, तांदूळ अशा धान्याच्या दरात काहीही वाढ नाही, विदेशात वेगवेगळ्या कारणांनी अडकून पडलेल्या २ लाख लोकांची सुटका, पासपोर्ट त्वरीत मिळणे, देशातील अनेक रस्त्यांची उत्तमप्रकारे पूर्णत: , त्यामुळे व्यवसाय वाढले. परंतु, विरोधकांकडून बेरोजगारीचे आकडे ज्या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालाचा दाखला देत सांगितले जाते तो अहवालच अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, तरीही टीका केली जात आहे, असे टीकास्त्र माजी लष्करप्रमुख व परराज्य व्यवहार मंत्री व्ही. के. सिंग यांनी विरोधकांवर सोडले.  सिंग हे पुण्यात येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिंग म्हणाले, काश्मीरमध्ये आपण सलग ७ वर्षे काम केले आहे. पण भाजपा सत्तेवर आल्यापासून हा प्रश्न चिघळला आहे असे वारंवार सांगण्यात येते, त्यात तथ्य नाही. तिथे काही समस्या आहेत, त्या अत्यंत जुन्या आहेत, त्या सोडवण्याचा राजकीय प्रयत्न करणे गरजेचे आहे व तो होत आहे. भारताची विदेशनिती ही भारताचे हित कशात आहे त्यावर अवलंबून असते, इतर देशांचे परस्परांशी कसे संबध आहेत त्यावर नाही. मोदी यांनी शपथविधी कार्यक्रमाला अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते. पाकिस्तानही त्यात होता. त्यावर सिद्ध होते की आम्हाला त्यांच्याबरोबर चांगले संबध ठेवायचे आहेत, मात्र बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊ शकत नाही, त्यामुळे वातावरण चांगले ठेवणे पाकिस्तानच्या हातात आहे व ते चांगले होत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही. ---------------------------------सैन्यदलासाठीच्या शस्त्र खरेदीत निविदा प्रसिद्ध करण्यापर्यंत येण्यासाठीच अनेक चाचण्या आहेत. निविदा प्राप्त झाल्यानंतरही नेहमीप्रमाणे कमी किंमतीच्या निविदेला पसंती असे करता येत नाही. कमी किमतीच्या निविदेत नमुद केलेला शस्त्रे तांत्रिकदृष्ट्या परिपुर्ण असतीलच असे नाही. राफेलच काय, प्रत्येक शस्त्रखरेदीच्या वेळी असा विचार करावाच लागतो.व्ही. के. सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानBJPभाजपाGovernmentसरकारRafale Dealराफेल डील