शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीमागे बेरोजगारी, जेलमधून सुटलेले गुन्हेगार : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 21:09 IST

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरात एका पाठोपाठ खुनाचे सत्र सुरु झाले होते.

ठळक मुद्दे५ खून २४ तासात उघडकीस

पुणे :  शहरात गेल्या ७ दिवसात ५ खुनाचे गुन्हे घडले असताना ते सर्व २४ तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरात वाढलेल्या गुन्ह्यांमागे लॉकडाऊनमुळे आलेली बेरोजगारी तसेच कारागृहातून पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरात एका पाठोपाठ खुनाचे सत्र सुरु झाले होते. गेल्या ७ दिवसात ५ गुन्ह्यांच्या घटना घडल्या होत्या. ते सर्व गुन्हे उघडकीस आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, बंडगार्डन येथील गुन्हा अधिक गंभीर स्वरुपाचा होता़ जमिनीच्या वादातून हा गुन्हा घडला असून त्यातील मारेकऱ्यासह चौघांना पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे यांचा मोठा वाटा आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखेच्या सर्व युनिटला कार्यरत करण्यात आले होते. अशा घटना होऊ नयेत, यासाठी उपाय योजना केल्या जात आहे. गंभीर गुन्हे घडल्यानंतर त्या केवळ उघडकीस आणण्याबरोबर त्याची सर्व पाळेमुळे शोधून काढण्यावर भर असणार आहे. 

लॉकडाऊनच्या काळात पॅरोलवर तब्बल २६० गुन्हेगारांना जामीन देण्यात आला आहे़ त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. कारागृहातून सुटलेले गुन्हेगार आणि बेरोजगारी हे शहरातील वाढलेल्या गुन्ह्यांमागील एक प्रमुख कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र त्याचा संपूर्ण डाटा नाही. 

महिलांना रात्री सुरक्षित वाटले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करण्यावर आपला प्रयत्न राहणार असून त्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येणार आहे. केवळ आदेश काढणे यावर आपले काम थांबणार नसून त्याची अंमलबजावणी सुरु होऊन परिणाम दिसू लागतील, तेव्हाच त्यांची घोषणा करणे हा आपला स्वभाव आहे. गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत असून गुन्हेगारी संपविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांवर आपला भर असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ़ संजय शिंदे, नामदेव चव्हाण उपस्थित होते. ़़़़़़़़़़गेल्या आठ दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी तसेच संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी माहिती घेतली. तसेच तपास यंत्रणांना कामाला लावले़ पोलीस आयुक्त आहे, म्हणजे केवळ ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यावर आपला भर असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसcommissionerआयुक्तjailतुरुंग