शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

नजरचुकीने मिळाला खजिना

By admin | Updated: August 17, 2015 02:48 IST

कल्याण आळेफाटा एस टी बसने प्रवास करणारे पिंपळवंडी येथील दौलत गंगाराम कालेकर यांनी ओतूर येथे उतरताना नजरचुकीने बॅग घेऊन घरी पोहोचले.

आळेफाटा : कल्याण आळेफाटा एस टी बसने प्रवास करणारे पिंपळवंडी येथील दौलत गंगाराम कालेकर यांनी ओतूर येथे उतरताना नजरचुकीने बॅग घेऊन घरी पोहोचले. अन बॅगमध्ये तीन लाख पंचाहत्तर हजार असल्याचे निदशर्नास आले. आळेफाटा पोलीस ठाणे गाठून त्यांनी प्रामाणिकपणे ही रक्कम संबंधित व्यक्तीस परत केली.याबाबत माहिती अशी काल दुपारनंतर कल्याण आळेफाटा या एस.टी बसमध्ये आळेफाटाकडे येणारे पिंपळवंडी परिसरातील कालेकरवाडी येथील दौलत गंगाराम कालेकर व वडगाव कांदळी येथील निवृत्ती लक्ष्मण पवार हे आपल्या बॅगेसह शेजारी बसून प्रवास करत होते. ओतूर बसस्थानकात दौलत कालेकर आपली बॅग घेऊन उतरले. तर निवृत्ती पवार हे आळेफाटा येथे उतरले. मात्र आपली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ओतूर येथे जाऊन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दरम्यान दौलत कालेकर हे आपल्या घरी आले. त्यांनी कल्याण येथून आणलेल्या वस्तू बॅगमधून बाहेर काढण्यासाठी बॅग उघडली तो त्याना बॅगमध्ये नोटांचे बंडल दिसले व ही बॅग आपली नसल्याचे लक्षात आले. कालेकर यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात ही बॅग आणत पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना नजरचुकीने ही बॅग ओतूर बसस्थानकात उतरताना आपलेकडे आल्याचे सांगितले. पवार हे रात्रीच आळेफाटा येथे आले त्यानी बॅग आपली असल्याचे सांगितले.