नजरचुकीने मिळाला खजिना
By Admin | Updated: August 17, 2015 02:48 IST2015-08-17T02:48:21+5:302015-08-17T02:48:21+5:30
कल्याण आळेफाटा एस टी बसने प्रवास करणारे पिंपळवंडी येथील दौलत गंगाराम कालेकर यांनी ओतूर येथे उतरताना नजरचुकीने बॅग घेऊन घरी पोहोचले.

नजरचुकीने मिळाला खजिना
आळेफाटा : कल्याण आळेफाटा एस टी बसने प्रवास करणारे पिंपळवंडी येथील दौलत गंगाराम कालेकर यांनी ओतूर येथे उतरताना नजरचुकीने बॅग घेऊन घरी पोहोचले. अन बॅगमध्ये तीन लाख पंचाहत्तर हजार असल्याचे निदशर्नास आले. आळेफाटा पोलीस ठाणे गाठून त्यांनी प्रामाणिकपणे ही रक्कम संबंधित व्यक्तीस परत केली.
याबाबत माहिती अशी काल दुपारनंतर कल्याण आळेफाटा या एस.टी बसमध्ये आळेफाटाकडे येणारे पिंपळवंडी परिसरातील कालेकरवाडी येथील दौलत गंगाराम कालेकर व वडगाव कांदळी येथील निवृत्ती लक्ष्मण पवार हे आपल्या बॅगेसह शेजारी बसून प्रवास करत होते. ओतूर बसस्थानकात दौलत कालेकर आपली बॅग घेऊन उतरले. तर निवृत्ती पवार हे आळेफाटा येथे उतरले. मात्र आपली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ओतूर येथे जाऊन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
दरम्यान दौलत कालेकर हे आपल्या घरी आले. त्यांनी कल्याण येथून आणलेल्या वस्तू बॅगमधून बाहेर काढण्यासाठी बॅग उघडली तो त्याना बॅगमध्ये नोटांचे बंडल दिसले व ही बॅग आपली नसल्याचे लक्षात आले. कालेकर यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात ही बॅग आणत पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना नजरचुकीने ही बॅग ओतूर बसस्थानकात उतरताना आपलेकडे आल्याचे सांगितले. पवार हे रात्रीच आळेफाटा येथे आले त्यानी बॅग आपली असल्याचे सांगितले.