शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी आले पाण्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:34 IST

उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.

भोर : उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीरा नदीचा उगम आहे. धरण बांधण्याच्या आधी  नीरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती. इतिहासात हिरडस मावळ या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती. कोकणाला जोडणारा वरंध घाट या भागातून जातो. डोंगरात प्रामुख्याने हिरडा, आईन, शिसव, सागवान यांची झाडे अधिक आहेत. मात्र, हिरड्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘हिरडस मावळ’ नाव मिळाले असल्याचे येथील इतिहास संशोधक सुरेश शिंदे यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने नीरा नदीवर नीरा-देवघर धरण बांधले. त्यानंतर नीरा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावातील नागरिक विस्थापित झाले. त्याच वेळी हिरडोस मावळातील महत्त्वाचे असलेले व्यापारी हिर्डोशी गावही विस्थापित झाले. नीरा-देवघर धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे धरणात गेलेले हिर्डोशी गाव जवळपास २० वर्षांनंतर पाण्याबाहेर आले आहे.  गावाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत. त्या काळातील डांबरी रस्ता आजही चांगल्या अवस्थेत आहे. विविध प्रकारचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यावसायिक दुकानांचे जोते येथील वैभवशाली दुकानांची आठवण करून देतात. जि. प. शाळा, आरोग्य केंद्र, पीठगिरणी, पोलीस चौकी, ग्रामदैवत इत्यादीचे आवशेष आहेत. बसथांब्याजवळ दगडी शिळा असून त्यावर महाड २५ किलोमीटर असे लिहिलेले दिसत आहे. नवीन रस्त्यामुळे सध्याचे महाडचे अंतर वाढून ४५ किलोमीटर झाले आहे. स्थानिक नागरिक धरणात जाऊनही आमची शाळा, हा दवाखाना, हे माझे घर असे दाखवून कळत-नकळत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना नवीन गावात जरी पुनर्वसन झाले असले, तरी मातीत रुतलेल्या भावना कडूगोड आठवणी पाण्याखालीच राहिलेल्या आहेत. पडझड झालेले ग्रामदैवत शंभुमहादेवाचे पूर्वाभिमुखी मंदिर मंदिरातील शिवलिंग आहे. समोरील बाजूला काही शूरवीरांचे पराक्रम सांगणारे बºयाच वीरगळी या ठिकाणी आहेत. येथील पाण्याबाहेर आलेल्या सर्व बाबी आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी सांगत असून वैभवशाली हिर्डोशी आज येथील लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहत असल्याचे इतिहाससंशोधक सुरेश शिंदेयांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळ