शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘मॉडेल’ पदपथाकडे होतेय दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 11:38 IST

सुरूवातीपासूनच हा पदपथ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.

ठळक मुद्दे कोट्यावधी रुपये खर्चून पदपथाची रचना बदलत मॉडेल पदपथ तयार संभाजी उद्यानासमोर लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली काही खेळणीही तुटलीबसण्याच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या मॉडेल पदपथाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही भागात दुचाकी वाहनांचे पार्किंग, फेरीवाले, पानटपऱ्यांचे कचऱ्याचे डबे, बाकड्यांवर मद्यपींचे लोटांगण यामुळे पदपथाची स्थिती बिघडू लागली आहे. याबाबत नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्या काळात जंगली महाराज रस्त्यावरील पदपथाचे विस्तारीकरण करण्यात आले. कोट्यावधी रुपये खर्चून पदपथाची रचना बदलत मॉडेल पदपथ तयार करण्यात आला. नागरिकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी मनसोक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली.स्वतंत्र सायकल ट्रॅक, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, ठिकठिकाणी गार्डनिंग करण्यात आले. त्यामुळे सुरूवातीपासूनच हा पदपथ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या पदपथाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण त्याकडे आता काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.संपुर्ण पदपथावर ठिकठिकाणी विविध प्रकारची फुलझाडे, गवत लावण्यात आले आहे. काही भागात ही झाडे जवळपास गायब झाली आहेत. ठिबक सिंचनाच्या पाईपची दुरावस्था झाली आहे. पदपथावर ठिकठिकाणी वाहने उभी केली जातात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे प्रमाण अधिक आहे. फेरीवाले, दुकानदारांच्या पाट्या वाढू लागल्या आहेत. फेरीवाले व पानटपऱ्यांचे कचऱ्याचे डबे पदपथावरच ठेवले जातात. पान, पानमसाला खाऊन अनेक जण त्यातच तर काही जण परिसरातील झाडांवर पिचकाऱ्या मारतात. धुम्रपानही केले जाते. त्यामुळे नागरिकांना या पदपथावरून चालताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. संभाजी उद्यानासमोर लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली काही खेळणीही तुटली आहेत. बसण्याच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातो. हा कचरा बागेमध्ये जात आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चुन सुसज्ज करण्यात आलेल्या पदपथाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.-----------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkunal kumarकुणाल कुमार